मुख्यमंत्री सचिवालय कक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्री सचिवालय कक्ष
मुख्यमंत्री सचिवालय कक्ष

मुख्यमंत्री सचिवालय कक्ष

sakal_logo
By

70772

नागरिकांच्या प्रश्नांचा निपटारा होणार
पालकमंत्री केसरकर; मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता.२५: राज्याच्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, प्रलंबित कामे, निवेदने व अर्ज मुख्यमंत्री सचिवालय कक्षात प्रत्यक्ष नागरिक येऊन देतात. त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास होतो व ते अर्ज, निवेदने पुन्हा क्षेत्रीय स्तरावरच पाठवले जातात. यामध्ये नाहक दिरंगाई होते. त्यामुळे या अर्ज, निवेदनांचा जिल्हास्तरावरच निपटारा करण्यासाठी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष उपयुक्‍त ठरेल, असा विश्‍‍वास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्‍त केला. जिल्हाधिकारी कार्यालयात या कक्षाचे उद्‌घाटन करताना ते बोलत होते.
खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील, प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, राजूबाबा आवळे, प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके उपस्थित होते.
या कक्षाचे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी कार्यरत राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांकडे सादर करावयाचे अर्ज, निवेदने व संदर्भ या कक्षात प्रत्यक्ष सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.