कोल्हापूर- मिरज रेल्वे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर- मिरज रेल्वे
कोल्हापूर- मिरज रेल्वे

कोल्हापूर- मिरज रेल्वे

sakal_logo
By

कोल्हापूर-मिरज रेल्वे
पॅसेंजर सेवा गुरुवारपर्यंत रद्द
---
गाड्या पुणे, कलबुर्गी, मिरजेपर्यंत धावणार
कोल्हापूर, ता. २४ ः कोल्हापूर रेल्वेस्थानकातील इंटरलॉकिंग आणि फलाट विस्तारीकरणाच्या कामामुळे मिरज-कोल्हापूर आणि कोल्हापूर-मिरज पॅसेंजर सेवा गुरुवार (ता. २९)पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
यात गाडी क्रमांक ०१५१३ मिरज-कोल्हापूर, गाड्या क्रमांक ०१५४३, ०१५४४, ०१५४७, ०१५४८ मिरज–कोल्हापूर–मिरज, ०१५४९ सांगली-मिरज आणि ०१५५० कोल्हापूर–सांगली पॅसेंजर या गाड्या बुधवार (ता. २८)पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. गाडी क्रमांक ११४२६ कोल्हापूर ते पुणे एक्स्प्रेस गुरुवारपर्यंत मिरज ते पुणे धावेल, म्हणजेच ही गाडी कोल्हापूर-मिरजदरम्यान रद्द राहील. गाडी क्रमांक ११०२९ मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कोल्हापूर मंगळवारी (ता. २७) आणि बुधवारी मिरज येथे थांबेल व मिरज-कोल्हापूरदरम्यान रद्द राहील; तर बुधवारी व गुरुवारी गाडी क्रमांक ११०३ कोल्हापूरहून मुंबईकडे धावणारी कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस मिरजहून मुंबईकडे वळविण्यात येणार आहे.
गाडी क्रमांक ११४०३ नागपूरहून कोल्हापूरकडे मंगळवारी धावणारी नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेस हातकणंगले येथे थांबवली जाईल. म्हणजेच ही गाडी हातकणंगले-कोल्हापूरदरम्यान रद्द राहील. गाडी क्रमांक २२१५५ कलबुर्गी-कोल्हापूर एक्स्प्रेस बुधवारी कलबुर्गीहून कोल्हापूरकडे धावणारी गाडी मिरज येथे थांबवली जाईल. म्हणजेच ही गाडी मिरज-कोल्हापूरदरम्यान रद्द राहील. गाडी क्रमांक २२१५६ कोल्हापूर-कलबुर्गी एक्स्प्रेस मिरजहून कलबुर्गीकडे वळवली जाईल. गाडी क्रमांक ११४२५ पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेस बुधवारी पुण्याहून मिरजपर्यंत धावेल व मिरज-कोल्हापूरदरम्यान रद्द राहील. गाडी क्रमांक ०१५४१/०१५४२ कोल्हापूर-सातारा-कोल्हापूर पॅसेंजर बुधवारी धावणार असून, मिरज-सातारा-मिरजदरम्यान धावेल. म्हणजेच ही गाडी मिरज-कोल्हापूर-मिरजदरम्यान रद्द राहील.
...

वेळांची खात्री करून
प्रवास करणे सोयीचे
येथील रेल्वेस्थानकावरील फलाटाचे विस्तारीकरण तसेच अन्य तांत्रिक कामांसाठी येत्या गुरुवार (ता. २९)पर्यंत पॅसेंजर गाड्यांचा कोल्हापुरातील प्रवास तात्पुरता बंद राहील; तर काही गाड्यांच्या प्रवास मार्गात रेल्वे प्रशासनाने तात्पुरते बदल केले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी रेल्वे वेळांची खात्री करूनच प्रवास करणे सोयीचे होईल.