
अपघातात मृत्यू
70791
....
सानेगुरुजी बस थांब्यानजीक अपघातात वृद्धाचा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ ः अज्ञात वाहनाच्या धडकेत गजानन विठ्ठल गंगधर (वय ६४, बिडी कॉलनी) यांचा मृत्यू झाला. काल (ता. २३) रात्री दहाच्या सुमारास सानेगुरुजी बस थांब्यानजीक ही घटना घडली. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली.
याबाबत अधिक माहिती अशी, गजानन गंगधर हे टेलरिंगचे काम करत होते. काल रात्री दहाच्या सुमारास दुकान बंद करून ते मोपेडवरून घरी निघाले होते. मुख्य रस्त्यावरून काही अंतरावर वळले असताना अज्ञात वाहनाने गंगधर यांच्या मोपेडला धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. तेथूनच निघालेल्या एका रुग्णवाहिकेमधून नागरिकांनी त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे, जावई असा परिवार आहे.