
जिल्हास्तरीय खो- खो स्पर्धेत आजरा महाविद्यालयाचे यश
जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत
आजरा महाविद्यालयाचे यश
आजरा, ता. २६ ः इचलकरंजी (ता. हातकणंगले) येथे जयहिंद क्रीडा मंडळातर्फे झालेल्या शासकीय जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत आजरा महाविद्यालयाने यश मिळवले. कनिष्ठ विभागातील विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. धीरज चौगुले, शैलेश पाटील, ओंकार मनगुतकर, गौरव सुतार, मनोज व्होरटे, हर्ष चौगुले, प्रथमेश गिरी, शुभम मळगेकर, आदिनाथ परीट, मयूर पाटील, हर्षद परीट, साहिल मोहिते, सुदेश कांबळे, आप्पा शिंगटे, परशुराम कदम यांचा संघात समावेश आहे. जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक चराटी, उपाध्यक्ष विलास नाईक, संचालक, प्राचार्य डॉ. अशोक सादळे, उपप्राचार्य दिलीप संकपाळ, पर्यवेक्षक प्रा. मनोज देसाई, कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील यांचे प्रोत्साहन लाभले. क्रीडाशिक्षक प्रा. अल्बर्ट फर्नांडिस व प्रा. डॉ. डी. जे. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.