कोवाडला उद्या पिक संरक्षणावर चर्चासत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोवाडला उद्या पिक संरक्षणावर चर्चासत्र
कोवाडला उद्या पिक संरक्षणावर चर्चासत्र

कोवाडला उद्या पिक संरक्षणावर चर्चासत्र

sakal_logo
By

कोवाडला उद्या पीक संरक्षणावर चर्चासत्र
कोवाड ः येथील साई शेती सेवा केंद्र व आदामा इंडिया कंपनीतर्फे शेतकऱ्यांसाठी ऊस व मका पिकाच्या संरक्षणावर बुधवारी (ता. २८) सकाळी १० वाजता श्री मंगल कार्यालयात चर्चासत्र आयोजित केले आहे. चंदगड तालुक्यात ऊस हे मुख्य पीक असल्याने या पिकावर वारंवार वेगवेगळ्या समस्या येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर चर्चासत्राचे आयोजन केले आहे. चर्चासत्रात प्रमोद सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत सतीश शिंगणे, सागर गार्डे, दीपक भालेराव, गणेश काटकर व सचिन पाटील मार्गदर्शन करणार आहेत. शेतकऱ्यांनी चर्चासत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.