
इचल: निवड आवश्यक
70912
उल्हास पुजारी, विनायक जाधव
...
‘आम्ही इचलकरंजीकर’च्या अध्यक्षपदी पुजारी
उपाध्यक्षपदी जाधव ः संस्थेत प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश
इचलकरंजी, ता. २५ ः येथील ‘आम्ही इचलकरंजीकर’ या संस्थेच्या अध्यक्षपदी जलसंपदा कोल्हापूर विभागाचे कार्यकारी अभियंता उल्हास पुजारी, उपाध्यक्षपदी कार्यकारी अभियंता पाणी गुणवत्ता विभाग कोल्हापूरचे विनायक जाधव यांची निवड केली. सचिवपदी जत नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे, सहसचिवपदी मुंबईचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र काणे, तर कोषाध्यक्षपदी नागपूर येथील सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत मेटे यांची निवड केली.
मार्गदर्शक मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यामध्ये नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली.
शहरातील अनेक प्रशासकीय अधिकारी राज्यात विविध पदांवर कार्यरत आहेत. या अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन या संस्थेची स्थापना केली आहे. शहराच्या विकासासाठी तसेच विविध क्षेत्रांत कार्य करण्यासाठी आराखडा तयार केला आहे. याची ठोस अंमलबजावणी करण्यासाठी ही कार्यकारिणी तयार केली आहे. नवीन वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचेही यावेळी नियोजन करण्यात आले.
अन्य कार्यकारिणी सदस्य अशी, शीतल म्हेतर (सहायक आयुक्त, जीएसटी विभाग), वर्षा कावडे (सहायक पोलिस निरीक्षक, सीआयडी कोल्हापूर), विकास बडवे (सहायक पोलिस निरीक्षक, मुरगूड ), संजय नदाफ (सहायक सरकारी अभियोक्ता, म्हसवड), प्रवीण फाटक (अधीक्षक, शालेय पोषण आहार, हातकणंगले पंचायत समिती ), शंकर पोवार (मुख्याध्यापक, शाहू हायस्कूल), स्वरूप खारगे (मुख्याधिकारी, गडहिंग्लज नगरपरिषद) व सोमनाथ रसाळ (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सिंधुदुर्ग).