
‘बहुजन परीवर्तन’कडून मनुस्मृतीचे दहन
chd२५१.jpg
70914
पाटणे फाटा ः मनुस्मृती ग्रंथाचे दहन करताना बहुजन परीवर्तन संघटनेचे कार्यकर्ते.
--------------------------------------
‘बहुजन परीवर्तन’कडून मनुस्मृतीचे दहन
पाटणे फाटा पोलिस चौकीवर मोर्चा; भाजप, आरएसएसचा निषेध
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २५ ः चंदगड तालुका बहुजन परीवर्तन संघटनेतर्फे आज पाटणे फाटा (ता. चंदगड) पोलिस चौकीवर मोर्चा काढला. भाजप व आरएसएसकडून सातत्याने महापुरुषांची बदनामी केली जात असल्याने त्यांच्या निषेधार्थ हा मोर्चा काढला. पोलिस उपनिरीक्षक सत्पाल कांबळे यांना निवेदन दिले. तत्पूर्वी मनुस्मृती ग्रंथाचे दहन केले.
भारतीय बौध्द महासभेच्या कार्यालयापासून मोर्चाला सुरवात झाली. पाटणे फाटा बस स्थानकाजवळ आल्यावर मनुस्मृतीचे दहन केले. प्रकाश नाग म्हणाले, ‘आजच्या दिवशी १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडला मनुस्मृतीचे दहन केले. माणसाला माणूस म्हणून जगण्याचे हक्क नाकारणाऱ्या व्यवस्थेला विरोध करुन बहुजन समाजाला बंधमुक्त केले.’ संघर्ष प्रज्ञावंत म्हणाले, ‘महापुरुषांनी स्वतःच्या बहुजन समाजाच्या हितासाठी स्वतःच्या जीवनाची आहुती दिली. त्यांच्याविषयी भाजप व आरएसएसचे कार्यकर्ते वाट्टेल ते बोलतात ते खपवून घेतले जाणार नाही.’ तुकाराम कांबळे, विष्णू कार्वेकर, एकनाथ कांबळे, रामचंद्र कांबळे, कमलेश कांबळे, सागर कांबळे, नरसिंग कांबळे, श्रीनिवास कांबळे, राकेश कोळी, मिनाक्षी कांबळे, अनघा प्रधान, नामदेव कांबळे आदी उपस्थित होते. कामत यांनी आभार मानले. त्यानंतर पाटणे पोलिस चौकीवर जाऊन उपनिरीक्षक सत्पाल कांबळे यांना निवेदन दिले.