
कौलगेत खो-खो स्पर्धा उत्साहात
70919
कौलगे : नाळ फाउंडेशनतर्फे झालेल्या खो-खो स्पर्धेतील विजेत्या उत्तूर विद्यालयाला बक्षीस देताना मल्लिकार्जुन बोरगावे. शेजारी फाउंडेशनचे पदाधिकारी.
कौलगेत खो-खो स्पर्धा उत्साहात
गडहिंग्लज : कौलगे (ता. गडहिंग्लज) येथील नाळ फाउंडेशनतर्फे शालेय खो-खो स्पर्धा झाल्या. न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत १६ संघ सहभागी झाले होते. उत्तूर विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला. २१०० रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. हिरण्यकेशी विद्यालयाने (हिरलगे) द्वितीय, तर महाराष्ट्र हायस्कूलने (अत्याळ) तृतीय क्रमांक मिळविला. त्यांना अनुक्रमे १५०० व ११०० रुपयांचे बक्षीस देण्यात आले. वसंत खोराटे व दिगंबर शिंदे यांनी पंच म्हणून, तर ऋतुजा भाट यांनी स्कोअरर म्हणून काम पाहिले. भाऊसाहेब कांबळे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. स्पर्धेनंतर लगेचच बक्षीस वितरण कार्यक्रम झाला. नाळ फाउंडेशनचे अमोल पाटील, संजय पोवार, सागर पोवार, संजय गाडे, पवन बागडी, अजित वडर, दत्तात्रय मडकर, केदारी शिंदे, मल्लिकार्जुन बोरगावे आदी उपस्थित होते.