कोल्हापूर जिल्हा बहुजन माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर जिल्हा बहुजन माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी
कोल्हापूर जिल्हा बहुजन माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी

कोल्हापूर जिल्हा बहुजन माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी

sakal_logo
By

70975
...

अंधश्रद्धेवर विज्ञानाच्या
आधारे मात करणे आवश्यक

डॉ. श्रीमंत कोकाटे ः बहुजन माध्यमिक शिक्षक व सेवक पतसंस्थेतर्फे पारितोषिक वितरण

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ ः ‘विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता धाडसाने परिपूर्ण अभ्यास करून आयुष्य उज्ज्वल करावे. अंधश्रद्धा पसरवण्याचे काम अधिक जोमाने करणाऱ्यांविरुद्ध विज्ञानाच्या आधारे मात केली पाहिजे. समाजाप्रती आपली बांधिलकी असून प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून सामाजिक परिवर्तनासाठी एकत्र येणे काळाची गरज आहे,’ असे प्रतिपादन इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा बहुजन माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेच्या २५ व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सभासदांच्या पाल्यांचा वार्षिक गुणगौरव पारितोषिक वितरण व निवृत्त सभासदांचा सत्कार सोहळा झाला. आचार्य विद्यानंद संस्कृती भवनात झालेल्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेचे संस्थेचे ज्येष्ठ संचालक प्रकाश पवार, नंदकुमार कांबळे, रवींद्र मोरे, रघुनाथ कांबळे, बापू कांबळे, दत्तात्रय टिपुगडे, सुजाता भास्कर यांचे हस्ते पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी शहाजी कांबळे होते. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ मांडरे यांनी केले.
शहाजी कांबळे यांनी संघर्षासाठी सर्वांनी एकत्र येऊन उत्कर्षासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी उपाध्यक्ष विकास कांबळे, समिती सदस्य राहुल माणगावकर, दिलीप वायदंडे, संजय कांबळे, रघुनाथ कांबळे, योगेश वराळे, व्यवस्थापक बाबूराव देसाई उपस्थित होते. सूत्रसंचालन शीतल हिरेमठ यांनी केले.