
आवश्यक- संक्षिप्त
70623
लँडस्केप डिझाईन स्पर्धेत
कला प्रबोधिनीचे यश
कोल्हापूर : गार्डन्स क्लबतर्फे घेण्यात आलेल्या पुष्प प्रदर्शनात कलाप्रबोधिनीज् इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. चित्रकला, उद्यान डिझाईन स्पर्धेत दोन ग्रुप सहभागी झाले. एका ग्रुपने ‘बॉटनिकल रनवे’मध्ये सहभाग घेतला. चित्रकला स्पर्धेत प्रथमेश कदम याने प्रथम क्रमांक मिळवला. उद्यान डिझाईन स्पर्धेत ट्रॅडिशनल व लो मटेरियल या थीमच्या अनुषंगाने उद्यान डिझाईन केले होते. त्यामधून ‘ट्रॅडिशन’ या थीमनुसार केलेल्या उद्यान डिझाईनला द्वितीय क्रमांक व लो मटेरियल या थीमनुसार केलेल्या उद्यानास तृतीय क्रमांक मिळाला. उद्यान डिझाईन स्पर्धेसाठी आर्किटेक्ट संदीप घोरपडे आणि आर्किटेक्ट राजेंद्र संकपाळ यांनी परीक्षण केले. गार्डन्स क्लबच्या अध्यक्ष कल्पना सावंत, सचिव पल्लवी कुलकर्णी, कविता घाटगे, डॉ. गीता पिलाई व सिनेअभिनेते विराट मडके यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण झाले.