चिक्कोडे ग्रंथालयात रक्तदान शिबीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिक्कोडे ग्रंथालयात रक्तदान शिबीर
चिक्कोडे ग्रंथालयात रक्तदान शिबीर

चिक्कोडे ग्रंथालयात रक्तदान शिबीर

sakal_logo
By

भालचंद्र चिकोडे ग्रंथालयातील
रक्तदान शिबिरला प्रतिसाद

कोल्हापूर, ता. २५ ः माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज भालचंद्र चिकोडे ग्रंथालयातर्फे आज रक्तदान शिबिर झाले. यामध्ये सुमारे ७६२ जणांनी रक्तदान केले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आवाडे, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अधिकारी राजेश क्षीरसागर यांनी भेट दिली. भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी आयोजन केले होते.
मंत्री पाटील यांच्या हस्ते अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मंत्री पाटील म्हणाले, ‘अटलजींनी संपूर्ण आयुष्य देशाची संस्कृती, संवर्धन आणि विकासासाठी समर्पित केले. अटलजींनी एका अर्थाने एका नव्या युगाची सुरवात केली. त्यांचे स्वप्न मोदीजी पूर्ण करत आहेत.’
समरजितसिंह घाटगे, माजी आमदार अमल महाडिक, महेश जाधव, सत्यजित कदम, अशोक देसाई, कृष्णराज महाडिक, मिलींद धोंड उपस्थित होते.
शिबिरासाठी अर्पण ब्लड बँकेचे बाबासाहेब आगाव, माधव ढवळीकर, डॉ. प्रकाश गाडवे, डॉ. श्रीकांत नलवडे, डॉ. राजेंद्र चिंचणीकर, रवी पाटील, सीपीआर रक्तपेढीचे डॉ. प्रतीक शिंदे, रणजित केसरे, जयवंत कदम, प्रेमचंद्र कमलाकर यांनी मार्गदर्शन केले.