इचलकरंजी प्रेस क्लबचे पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजी प्रेस क्लबचे पुरस्कार
इचलकरंजी प्रेस क्लबचे पुरस्कार

इचलकरंजी प्रेस क्लबचे पुरस्कार

sakal_logo
By

71043
ॲड. दिलशाद मुजावर, कृष्णात गोंदूकुपे, मंगल सुर्वे

इचलकरंजी प्रेस क्लबचे पुरस्कार
इचलकरंजी, ता. २६ : इचलकरंजी प्रेस क्लब व लायन्स क्लब यांच्यतर्फे पत्रकार दिनाच्या निमित्ताने देण्यात येणाऱ्या पुरस्काराची घोषणा आज करण्यात आली. इचलकरंजी शहरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची संघटना असणाऱ्या आम्ही इचलकरंजीकर संस्था, तृतीयपंथीयांसाठी कार्य करणाऱ्या ॲड. दिलशाद मुजावर, महिलांना आत्मनिर्भर करणाऱ्या मंगल सुर्वे व खिलाडी वृत्ती जोपासत अनेकांना प्रेरणा देणारे कृष्णात गोंदूकुपे यांचा यामध्ये समावेश आहे. अध्यक्ष शरद सुखटणकर यांनी पुरस्काराची घोषणा केली.
पुरस्कार वितरण ८ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम लायन्स क्लब सभागृह (दाते मळा) येथे होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार राजा माने यांची उपस्थित राहणार आहेत, तर आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी आमदार अशोक जांभळे, महापालिकेचे प्रशासक सुधाकर देशमुख यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सुखटणकर, उपाध्यक्ष अजय काकडे, लायन्सचे अध्यक्ष महेंद्र बालर यांनी केले.