बावडा क्रिकेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बावडा क्रिकेट
बावडा क्रिकेट

बावडा क्रिकेट

sakal_logo
By

वाय. बी. पाटील चषक झेंडा चौक संघाकडे
डोग्रा स्पोर्टस् उपविजेता ः डॉ. डी. वाय. पाटील ट्रस्टतर्फे आयोजन

कसबा बावडा, ता. २६ ः येथील पॅव्हेलियन मैदानावर डॉ. डी. वाय. पाटील ट्र्स्ट आयोजित कै. वाय. बी. पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेत प्रकाशझोतात खेळलेल्या अंतिम सामन्यात नवनाथ मित्र मंडळ प्रणित झेंडा चौक संघाने डोग्रा स्पोर्टस् संघाचा पराभव करून चषकावर नाव कोरले. झेंडा चौकचा मुकेश शिंदे याला मालिकावीर, तर इंझमाम नाईकवडे याला सामनावीरचा पुरस्कार मिळाला.
दरम्यान, बक्षीस वितरण तेजस सतेज पाटील यांच्या हस्ते झाले. विजेत्या झेंडा चौक संघाला १ लाख २१, तर उपविजेत्या डोग्रा स्पोर्टस् संघाला १ लाख रुपये रोख व चषक देण्यात आला. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या गोळीबार स्पोर्टस्, पुंडलिक वाईंगडे स्पार्टेस या संघांना रोख २१ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक, श्रीराम सोसायटीचे आजी-माजी संचालकांसह मान्यवर उपस्थित होते.
अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना झेंडा चौक संघाने निर्धारित आठ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात ६६ धावा केल्या. उत्तरादाखल डोग्रा स्पोर्टस् संघ ३६ धावांवरच गारद झाला. एकतर्फी सामना जिंकून झेंडा चौक संघाने बाजी मारली. त्यांच्या मुकेश शिंदे याने अष्टपैलू कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. प्रकाशझोतात झालेला हा सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी गर्दी केली होती. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी तानाजी लांडगे, श्रीकांत चव्हाण, शांताराम पाटील, आनंदा करपे यांनी परिश्रम घेतले.
या स्पर्धेसाठी विजेत्या संघाला ७५ हजार, तर उपविजेत्या संघाला ५१ हजारांचे बक्षीस जाहीर केले होते; पण अंतिम सामना पाहण्यासाठी मैदानात आलेले डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी या रक्कमेत मोठी वाढ केली. विजेत्या संघाला १ लाख २१ हजार, तर उपविजेत्या संघाला १ लाखाचे बक्षीस डॉ. पाटील यांनी जाहीर करताच मैदानावर एकच जल्लोष झाला.