सीमावाद स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीमावाद स्वागत
सीमावाद स्वागत

सीमावाद स्वागत

sakal_logo
By

एकीकरण समिती कार्यकर्त्यांचे
कोल्हापुरात जल्लोषी स्वागत

कोल्हापूर, ता. २६ : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर तत्काळ तोडगा काढावा. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कर्नाटक सीमाभाग केंद्रशसित प्रदेश म्हणून जाहीर करावा, यासाठी कोल्हापूरमध्ये धडक मोर्चा काढण्यात आला. तत्पूर्वी, कोगनोळी टोल नाका येथे विविध पक्ष, संघटनांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे जल्लोषी स्वागत करत त्यांना कोल्हापूरमध्ये आणले.
कर्नाटकच्या भाषिक जोखडातून मुक्त करावे, सीमाभाग महाराष्ट्रात घ्यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समिती आग्रही आहे. एकीकरण समितीकडून होणारी आंदोलने मोडीत काढण्याचे काम कर्नाटक सरकार करत आहे. या पार्श्वभूमीवर एकीकरण समितीसह महाविकास आघाडीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज कोगनोळी नाका येथे सीमाभागातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्रित आले. सीमाबांधवांना अपेक्षित असणारा लोकांचा पाठिंबा पाहून सर्वांनी कोल्हापूरवासीयांचे आभार मानले. कर्नाटकी जुलूमाला न जुमानता सीमावासीयांनीही धाडसाने कोल्हापूरमध्ये प्रवेश केला. कर्नाटक पोलिसांच्या अरेरावीला जशास- तसे उत्तर देत कोल्हापुरात दाखल झालेल्या सीमाभागातील बांधवांना कोल्हापूरवासियांनी दिलासा देण्याचे काम केले. दरम्यान, कोगनोळी येथून सीमाभागातील बांधव दुचाकी रॅलीने जोरदार घोषणा देत कोल्हापूरकडे रवाना झाले. शिवाजी विद्यापीठ, बागल चौक, बिंदू चौकापासून ते सोन्या मारूती चौक येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीला अभिवादन केले. राजर्षी शाहू महाराज यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करून ही रॅली दसरा चौक येथे आली. दसरा चौक येथील उपस्थित सर्वच पक्ष संघटनांनी सीमावासीयांचे जल्लोषी स्वागत केले.
...

हीच आमची ताकद ...

बेळगावमधून कोल्हापूरमध्ये जाण्यासाठी कर्नाटक पोलिस सोडतील की नाही, अशी भीती होती. पण, कोगनोळी टोलनाक्याच्या समोरच कोल्हापुरातील लोकांकडून होणारा जयघोष पाहिल्यानंतर कोणत्याही प्रकारची भीती राहिली नाही. त्यांनी केलेल्या स्वागतामुळे लढण्यासाठी आणखी बळ मिळाले आहे. हेच बळ आमची ताकद असल्याचे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवले.
....