एसजीएम ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटरमध्ये दुर्मीळ शस्त्रक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसजीएम ऑन्कोलाईफ कॅन्सर 
सेंटरमध्ये दुर्मीळ शस्त्रक्रिया
एसजीएम ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटरमध्ये दुर्मीळ शस्त्रक्रिया

एसजीएम ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटरमध्ये दुर्मीळ शस्त्रक्रिया

sakal_logo
By

एसजीएम ऑन्कोलाईफ कॅन्सर
सेंटरमध्ये दुर्मीळ शस्त्रक्रिया
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २६ : एक ३५ वर्षीय महिलेच्या स्तनात असलेली फायलॉइड ट्युमरची गाठ काढण्यात चिंचेवाडीच्या एसजीएम ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटरच्या स्त्री कर्करोगतज्ञ डॉ. तेजल गोरासिया यांना यश आले. यशस्वी शस्त्रक्रियेद्वारे १० बाय १० सेमीची गाठ काढून स्तन वाचवण्याची वैद्यक क्षेत्रातील ही दुर्मीळ घटना असल्याचे डॉ. गोरासिया यांनी सांगितले.
डॉ. गोरासिया यांनी सांगितले की, संबंधित महिलेच्या स्तनात सहा महिन्यापासून गाठ झाली होती. ’एसजीएम’मध्येच डॉ. गोरासिया व डॉ. भगवान उगले यांनी महिलेची प्राथमिक तपासणी केली होती. स्तनामध्ये १० बाय १० सेमीची गाठ असल्याचे आढळले. बायोप्सी तपासणीत ही गाठ फायलॉइड ट्युमरची असल्याचे निदान झाले. त्यासाठी शस्त्रक्रियेची गरज होती. परंतु वय कमी असल्याने स्तन गमावण्याची भिती रुग्णाच्या मनात होती. समुपदेशनानंतर रुग्णाचा होकार मिळाला. त्यानंतर डॉ. गोरासिया यांनी स्तन न काढता (ब्रेस्ट काँजर्वेशन) केवळ गाठ काढण्याची कठीण शस्त्रक्रिया यशस्वी केली. सहयोगी डॉ. उगले व इतर कर्मचार्‍यांचे परिश्रम व रुग्णालयातील आधुनिक उपचार पद्धतीमुळे महिलेचे स्तन वाचवून ही गाठ काढली. दरम्यान, महिलांनी अशी गाठ आढळल्यास घाबरून न जाता तपासणी करुन घ्यावी. योग्य वेळी उपचार झाल्यास स्तनाचा कर्करोग बरा होत असल्याचा विश्‍वास डॉ. गोरासिया यांनी दिला.