
जीवनातील आनंद, समृध्दता हरवतेय प्रशांत देशमुख;
ajr251.jpg
आजरा ः येथील पंचायत समितीमध्ये बोलताना लेखक प्रशांत देशमुख. व्यासपीठावर गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे, सहाय्यक गटविकास अधिकारी अविनाश पाटील, दिनेश शेट्टे आदी.
जीवनातील आनंद, समृद्धता हरवतेय
प्रशांत देशमुख; आजरा पंचायत समितीमध्ये व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २६ ः आजच्या युगात तंत्रज्ञानाने मोठी क्रांती केली आहे. माणूस तंत्रज्ञानाच्या आहारी गेला आहे. त्याच्याकडून अतिरिक्त वापर वाढत चालला आहे. भौतिक सुविधांची मानवी जीवनात रेलचेल वाढली आहे. त्यामुळे जीवनातील संवेदनशीलता, समृद्धता हरवत चालली आहे, असे प्रतिपादन लेखक प्रशांत देशमुख यांनी केले.
येथील आजरा पंचायत समिती येथे जीवनातील आनंद या विषयावर लेखक प्रशांत देशमुख यांचे व्याख्यान झाले. आजरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे, सहाय्यक गटविकास अधिकारी अविनाश पाटील प्रमुख उपस्थिती होते.
कृषी अधिकारी दिनेश शेटे यांनी स्वागत केले. देशमुख पुढे म्हणाले, ‘सध्याच्या टीव्ही मालिकांमुळे जगण्याचे विश्व बदलले आहे. कुटुंबात कलह सुरू झाले आहेत. याचे पडसाद दररोजच्या जीवनावर होत आहेत. सध्याच्या मालिकांचे विश्व व आपले जीवन वेगळे आहे. जीवनातील एकनिष्ठता व एकाग्रता कमी होत चालली आहे. हे समृद्धता संपण्याचे लक्षण आहे. जगण्याची सुंदरता फक्त पैसा व साधनावर नव्हे तर दुसऱ्याच्या आनंदात आहे. सध्याच्या पिढीला ग्रामीण जीवनशैली दाखवणे गरजेचे आहे. ही समृद्धता मुलांच्याकडे येणे गरजेचे आहे. आपण आपल्या कामाकडे कोणत्या दृष्टीने बघतोय त्यावर कामाचा आनंद अवलंबून आहे. जीवनावर श्रद्धा ठेवून काम केल्यास सकारात्मकता वाढते. सध्या मुलांची आवड ओळखून त्याचे करिअर ठरविले पाहिजे.’ या वेळी पंचायत समितीतील विविध विभागातील अधिकारी, ग्रामसेवक, कर्मचारी उपस्थित होते. एकनाथ गिलबिले यांनी सूत्रसंचालन केले. सहाय्यक गटविकास अधिकारी अविनाश पाटील यांनी आभार मानले.