हृदयस्पर्श संस्थेतर्फे हौशी संस्थांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हृदयस्पर्श संस्थेतर्फे हौशी संस्थांचा सत्कार
हृदयस्पर्श संस्थेतर्फे हौशी संस्थांचा सत्कार

हृदयस्पर्श संस्थेतर्फे हौशी संस्थांचा सत्कार

sakal_logo
By

हृदयस्पर्श परिवारातर्फे
हौशी नाट्य संस्थांचा गौरव

नाट्य चळवळ नेटाने पुढे नेण्याचा निर्धार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २६ ः यंदाची राज्य हौशी नाट्य स्पर्धा रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रंगली. त्यानंतर निकालही जाहीर झाला. मात्र, स्पर्धेत कोण जिंकले आणि कुणाला बक्षीस मिळाले, यापेक्षा सर्वांनी स्थानिक नाट्य चळवळ अधिक नेटाने पुढे नेऊ या, असा निर्धार नुकताच व्यक्त झाला. निमित्त होते, येथील हृदयस्पर्श सोशल अँड कल्चरल फाउंडेशनतर्फे आयोजित हौशी नाट्य संस्थांच्या गौरवाचे. दरम्यान, हृदयस्पर्श परिवाराचा हा उपक्रम राज्यासाठी अनुकरणीय असल्याच्या भावनाही अनेकांनी व्यक्त केल्या. राजर्षी शाहू स्मारक मिनी सभागृहात हा छोटेखानी कार्यक्रम रंगला.
रंगकर्मींची ऊर्मी वाढवणारा हा उपक्रम असल्याचे ज्येष्ठ रंगकर्मी लक्ष्मण द्रविड यांनी सांगितले. सावली केअर सेंटरचे किशोर देशपांडे, पत्रकार ताज मुल्लाणी, अभिजित सोकांडे, प्रकाश उपाध्ये, मकरंद लिंगनूरकर, अक्षरा सौंदलगे, डॉ. प्रमोद कसबे, नीलेश आवटी, शीतल पाखरे, अर्णवी उपराटे, अनिरुद्ध दांडेकर, किरणसिंह चव्हाण, विद्यासागर अध्यापक आदींनी मनोगत व्यक्त केले.
संस्थाध्यक्ष पद्माकर कापसे यांनी स्वागत केले. सचिव पद्मिनी कापसे यांनी प्रास्ताविक केले. समीर भोरे, पूजा पवार, सुनील शिंदे, विजय साळोखे, तुषार भिवटे, राजेंद्र मकोटे यांनी संयोजन केले.