माझी वसुंधरा कार्यशाळा उत्‍साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माझी वसुंधरा कार्यशाळा उत्‍साहात
माझी वसुंधरा कार्यशाळा उत्‍साहात

माझी वसुंधरा कार्यशाळा उत्‍साहात

sakal_logo
By

जिल्‍हा परिषद .... लोगो
...

माझी वसुंधरा अभियानात नागरिकांनी योगदान द्यावे

अरुण जाधवः दर पंधरा दिवसांनी होणार कामांचे मूल्यांकन
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. २६ : ‘माझी वसुंधरा अभियान ३.०’ हे जिल्‍ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत राबवले जाणार आहे. यामध्ये शासनाने ठरवून दिलेल्या शाश्‍‍वत विकासासाठी ज्या ९ संकल्‍पना दिल्या आहेत, त्यावर ग्रामपंचायतींनी काम करणे आवश्यक आहे. या उपक्रमात ग्रामपंचायतींनी केलेल्या कामाचा अहवाल दर पंधरा दिवसांनी सादर करावा. तसेच हे अभियान यशस्‍वी करण्यासाठी सर्व नागरिकांनी योगदान द्यावे, असे आवाहन ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांनी केले.
यावेळी केंद्रित केलेल्या प्रत्येक गावासाठी नेमलेल्या पालक अधिकारी यांनी दर शुक्रवारी ऑनलाईन व्ही. सी. द्वारे केलेल्या कामांचा आढावा सादर करण्याच्या सूचना केल्या.

माझी वसुधंरा अभियान ३.० अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचायतींपैकी केंद्रित केलेल्या ग्रामपंचायतीकडील संबंधित ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, तालुका व्यवस्थापक, केंद्र चालक व संबंधित विस्तार अधिकारी (पंचायत) यांची कार्यशाळा राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात घेण्यात आली. यावेळी विस्‍तार अधिकारी श्रीधर कुलकर्णी यांनी पंचमहाभूतांशी निगडित भूमी, अग्नी, जल, वायू व आकाश या पंचत्वांशी निगडित असणाऱ्या बाबींचे सखोल सादरीकरण केले. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार योजनेंतर्गत १७ शाश्वत विकासाच्या ध्येयाशी निगडित ९ संकल्पनांवरही चर्चा करण्यात आली.
या कार्यशाळेस प्र. सहा. गटविकास अधिकारी ऐ. एस. कटारे, जिल्हा नोडल अधिकारी सचिन शिरदवाडे, नितीन मोहिते, माझी वसुंधरा अभियान, ग्रामविकास अधिकारी एस. एस. चौगले, तसेच केंद्रित केलेल्या ग्रामपंचायतींकडील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
.....
माझी वसुंधरा अभियानांतर्गत
केंद्रित गावांची यादी
...
आजरा श्रृंगारवाडी, वाटंगी, वेळवट्टी, उत्तूर.
भुदरगड मडिलगे खुर्द, मिणचे खुर्द, पिंपळगाव, मुदाळ.
चंदगड धुमडेवाडी, शिवणगे, अडकूर, तुर्केवाडी.
गगनबावडा निवडे, वेतवडे, कोदे बु., तळिये बु.
गडहिंग्लज बेळगुंदी, इंचनाळ, बड्याचीवाडी, गिजवणे.
हातकणंगले दुर्गवाडी, संभापूर, माणगाव, शिरोली पुलाची.
करवीर शेळकेवाडी, म्हाळुंगे, सांगवडे, कणेरी, पाचगाव.
कागल पिराचीवाडी, बाळेघोळ, आलाबाद, अर्जुनी, कसबा सांगाव.
पन्हाळा गोलीवडे, काखे, पोर्ले-ठाणे, कोडोली.
राधानगरी बनाचीवाडी, चांदेकरवाडी, तारळे खुर्द, शेळेवाडी.
शाहूवाडी कातळेवाडी, नांदगाव, शिवारे, भेडसगाव.
शिरोळ हसूर, शिवनाकवाडी, धरणगुत्ती, नांदणी.