अभिजीत सूर्यवंशी स्मृतीदिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभिजीत सूर्यवंशी स्मृतीदिन
अभिजीत सूर्यवंशी स्मृतीदिन

अभिजीत सूर्यवंशी स्मृतीदिन

sakal_logo
By

71220

करियरबरोबरच राष्ट्रहितही जपूया
कर्नल शिवानंद वराडकर, शहीद वीर अभिजीत सूर्यवंशी स्मृतीदिन कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २६ ः विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रातच करियर करावे आणि त्यासाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. मात्र, करियरबरोबरच राष्ट्रहिताची भावनाही जपूया आणि चांगले नागरिक बनूया, असे स्पष्ट मत आज सेवानिवृत्त कर्नल शिवानंद वराडकर यांनी व्यक्त केले. शहीद वीर अभिजीत सूर्यवंशी यांच्या बावीसाव्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सुभेदार मेजर बंडू कात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत साकोली कॉर्नर येथे हा कार्यक्रम झाला. यानिमित्ताने सारा परिसर राष्ट्रभक्तीने भारावून गेला.
दरम्यान, शहीद वीर अभिजीत सूर्यवंशी ट्रस्टतर्फे १०९ टी. ए. मराठा बटालियन (एलआय) मध्ये विशेष कामगिरी केलेल्या जवानाला ‘बेस्ट जवान ऑफ द इअर'' या पुरस्काराने गौरवले जाते. यंदा शिपाई श्रीराम किरवत यांना या पुरस्काराने गौरवले. मानपत्र, स्मृतीचिन्ह व रोख पाच हजार रूपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.
शहीद अभिजीत सूर्यवंशी यांच्या स्मृती जपतानाच सैनिकांच्या मुलांसाठी ट्रस्टचे सुरू असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचेही कर्नल वराडकर यांनी सांगितले. टी. ए. बटालियनला वेगळी उंची मिळण्यामध्ये अभिजीत सूर्यवंशी यांचे योगदान मोठे असून, ते नव्या पिढीलाही सतत प्रेरणा देईल, असे सुभेदार मेजर कात्रे यांनी सांगितले. देशसेवा करण्याचे लहानपणापासून स्वप्न होते आणि म्हणूनच सैन्यदलात भरती झालो. हा पुरस्कार मला आणखी नेटाने लढण्याचे बळ देईल, असे किरगत यांनी सांगितले. कार्यक्रमात वुई फॉर सोल्जर संस्थेसह सर्जेराव विभूते यांनी ट्रस्टला देणगी दिली. यावेळी ट्रस्टच्या अध्यक्षा वीरमाता मनिषा सुर्यवंशी, अभिजीत बुधले, अनिल व्हटकर, धनंजय नामजोशी, शुभम विभूते, विनय हिबारे, निलेश ठाणेकर आदी उपस्थित होते. विश्वस्त महेश धर्माधिकारी यांनी स्वागत केले. कार्याध्यक्ष नितीन सुर्यवंशी पाहुण्यांची ओळख करून दिली. युवराज पाटील यांनी सूत्रसंचालन केले.