
वितरण आवश्यक- क्रीडा
वृत्तपत्र विक्रेता चषक क्रिकेट
स्पर्धेचा थरार आज रंगणार
कोल्हापूर, ता. २६ ः येथील शास्त्रीनगर क्रिकेट मैदानावर उद्या (मंगळवारी) राजारामपुरी वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे वृत्तपत्र विक्रेता चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा रंगणार आहे. सकाळी नऊ वाजता स्पर्धेला प्रारंभ होणार असून, संभाजीनगर डेपोविरुद्ध कावळा नाका डेपोमध्ये पहिला सामना होईल. त्यानंतर दिवसभरात एकूण सहा सामने होतील. उद्घाटन सागरमाळ स्पोर्टस् असोसिएशनचे अध्यक्ष काकासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सचिव विकास सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष किरण व्हनगुत्ते, शहराध्यक्ष रवी लाड, शहर संघटक शंकर चेचर यांची प्रमुख उपस्थिती असेल. चाटे शिक्षण समूहाचे प्रमुख भारत खराटे, दुर्वास कदम, आझम मुजावर, महेश उत्तुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी पाच वाजता पारितोषिक वितरण होईल. स्पर्धा संयोजन समितीतर्फे खेळाडूंना आवश्यक सर्व सुविधा पुरवल्या जातील, असे राजारामपुरी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे संघटक रमेश जाधव, अध्यक्ष असिफ मुल्लाणी यांनी कळवले आहे.