रंकाळा प्रदूषण नोटीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रंकाळा प्रदूषण नोटीस
रंकाळा प्रदूषण नोटीस

रंकाळा प्रदूषण नोटीस

sakal_logo
By

रंकाळाप्रश्‍नी ‘प्रदूषण नियंत्रण’ची
महापालिकेला दुसरी नोटीस

कोल्हापूर, ता. २६ ः रंकाळा तलावात अकरा ठिकाणाहून सांडपाणी विनाप्रक्रिया मिसळत असल्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसला उत्तर न दिल्याने मंडळाने दुसरी नोटीस बजावली. याबाबत प्रहार प्रतिष्ठानने तक्रार केली होती.
प्रहार प्रतिष्ठानने केलेल्या तक्रारीनुसार मंडळाने नोव्हेंबरमध्ये पाहणी केली होती. त्यावेळी अकरा ठिकाणांहून पाणी विनाप्रक्रिया रंकाळा तलावात मिसळत असल्याचे दिसले. यामुळे मंडळाने १ डिसेंबरला महापालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. सात दिवसांत म्हणणे मांडण्यास सांगितले होते. पण, वीस दिवस होऊनही महापालिकेकडून उत्तर आले नसल्याने मंडळाने त्याच आशयाची दुसरी नोटीस दिली. त्यात मागील नोटीसचा संदर्भ दिला असून, म्हणणे सादर केले नसल्याबद्दल ही नोटीस दिली असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
महापालिकेने रंकाळा तलावात सुरू केलेल्या कामांविरोधात प्रहार प्रतिष्ठानने तक्रार केली आहे. सुशोभीकरणाऐवजी प्रदूषण थांबवण्यासाठी निधी खर्च करावा, अशी त्यांची मागणी आहे. या पार्श्‍वभूमीवर मंडळाने महापालिकेला दुसऱ्यांदा नोटीस काढली आहे.