Tue, Feb 7, 2023

बनावट नोटरीच्या
चौकशीची मागणी
बनावट नोटरीच्या चौकशीची मागणी
Published on : 27 December 2022, 11:42 am
बनावट नोटरीच्या
चौकशीची मागणी
गडहिंग्लज : माझ्या मनाविरुद्ध केलेली नोटरी बनावट असून त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी श्रीमती कासूबाई दळवी (सुळे, ता. आजरा) यांनी केली आहे. याबाबत पोलिस उपाधीक्षकांना त्यांनी तक्रार अर्ज दिला आहे. त्यात म्हटले आहे की, कासूबाई यांच्या नावे मुंबईत खोली आहे. त्या वृद्ध असल्याने मुलगा संजय दळवी हेच त्यांची सेवाशुश्रुषा करतात. असे असताना त्याला व मलाही न विचारता, विश्वासात न घेता जबरदस्तीने ही नोटरी केली आहे. ती बनावट आहे. याबाबत आजरा पोलिसांत अदखलपात्र गुन्हाही नोंद आहे. यासंदर्भात चौकशी करून नोटरी करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी कासूबाई यांनी या अर्जातून केली आहे.