Mon, Jan 30, 2023

आजरा ः संक्षिप्त बातमी
आजरा ः संक्षिप्त बातमी
Published on : 27 December 2022, 6:33 am
वसंतराव देसाई यांना अभिवादन
आजरा, ता. 27 ः गवसे (ता. आजरा) येथील आजरा साखर कारखान्याचे संस्थापक (कै) वसंतराव देसाई यांना अभिवादन करण्यात आले. कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनिल शिंत्रे यांनी (कै) देसाई यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. प्रा. शिंत्रे यांनी देसाई यांच्या कार्याची माहिती दिली. या वेळी उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी, संचालक मुकुंदराव देसाई, एम. के. देसाई, अॅड. लक्ष्मण गुडुळकर, अनिल फडके, तानाजी देसाई, कार्यकारी संचालक डाॅ. टी. ए. भोसले, सचिव व्यंकटेश ज्योती उपस्थित होते.