लेख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लेख
लेख

लेख

sakal_logo
By

भोगावती वर्धापन दिन... आरोग्य

‘डायबेटिस मॅनेजमेंट’
‘प्रमेह’ भारतात सध्या सर्वाधिक पसरलेला आणि सर्वाधिक खर्च होणारा आजार आहे. दुर्दैवाने बहुतांश रुग्णांच्या आजाराचे निदानच होत नाही. या आजाराचा परिणाम म्हणून अनेकांना आपले जवळचे आप्त गमवावे लागत आहेत. वेळेत निदान व योग्य उपचाराच्या मदतीने ‘प्रमेहा’मुळे होणारे दुष्परिणाम टाळता येतात. रक्तातील साखरेच्या पातळीवर योग्य नियंत्रण न ठेवल्यास कधीकधी रुग्णाची स्थिती अधिक गंभीर होते. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे, हृदय, मूत्रपिंड, मेंदू आणि डोळ्यांनाही हानी पोहोचू शकते....

- डॉ. विजय बांगर

माधवबाग इन्फीनिटी, पहिला मजला, फ्लॅट नं. ४,
TJSB बँकेशेजारी, धैर्यप्रसाद हॉलसमोर,
ताराबाई पार्क, कोल्हापूर.
संपर्क : ०२३१-२६६५२७७, ८०५५८४६७७७.

शर्करा (साखर) शरीराला ऊर्जा पुरवणारा घटक असतो. प्रमेह हा शरीरांतर्गत बंधीरसाचे असंतुलन झाल्यामुळे होणारा विकार असून, त्यामुळे रक्तातील साखरेच्या नियंत्रणात बिघाड होतो. रक्तातील साखर वाढणे, हे शरीरांतर्गत असंतुलनाचे प्रमाण आहे. त्यामुळे साखरेच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अंतर्गत संतुलनात सुधारणा करावी लागते. एच. बी., ए. सी. ही तपासणी तुम्हाला रक्तातील तीन महिन्यांतील साखरेच्या प्रमाणाची सरासरी आणि अंतर्गत असंतुलनाविषयी माहिती देते.
रक्तात जास्त प्रमाणात साखर असणं शरीराच्या अंतर्गत असमतोलाचं निदर्शक असतं. त्यामुळे रक्तातील साखरेच्या याअंतर्गत असमतोलामध्ये सुधारणा घडवून आणणं आवश्यक असतं. ''एच.बी.ए. ९ सी.'' नावाची ही रक्त चाचणी तुम्हाला तीन महिन्यांतील रक्तातल्या साखरेची सरासरी तसेच अंतर्गत असमतोलाचं प्रमाण दाखवते.

जीवनाची प्रत व स्वास्थ्य यावर ‘प्रमेह’ कसा परिणामकारक?
दर दोन ‘प्रमेही’ रुग्णांमधला एकजण हृदयरोगी असू शकतो. ५० टक्के अॅटॅक सायलेंट असतात, प्रमुख कारण मधुमेह आहे. लक्षणे : थकवा, धूसर दृष्टी, वजन कमी होणे, अस्वस्थ झोप, वारंवार मूत्रप्रवृत्ती, पोटदुखी, उलटी होणे, असहनशील वागणे, पायात असाधारण संवेदना, अंग लुळे पडणे (पॅरालिसिस), इत्यादी.

प्रमेहासाठी काय तोडगा आहे?
अपेक्सबीट उपचार मालिकेत आंतरराष्ट्रीय व अत्याधुनिक अशा वैद्यकीय तपासण्या, संशोधनसिद्ध आहार, कौशल्यपूर्ण फिजिओथेरपी, अनुभवसिद्ध जीवनशैली सुधारणा यांची जोड शास्त्रशुद्ध व गुणकारी अशा आयुर्वेदिक उपचारांना दिली आहे. यामुळे तुमचा मधुमेह नियंत्रणात राहतो आणि त्यामुळे उद्भवणारे हृदयविकारासारखे धोके लांबणीवर टाकता येतात किंवा टाळताही येतात.

‘डायबेटिस रिव्हर्सल’ म्हणजे काय?
डायबेटिसच्या गोळ्यांचे प्रमाण हळूहळू कमी होऊन पूर्ण बंद होणे आणि तरीही रक्तातील साखर योग्य प्रमाणात राहणे, एच.बी.ए. ९ सी. सातपेक्षा कमी येणे म्हणजे डायबेटिस रिव्हर्सल होय.

हे कसे शक्य आहे?
प्रौढ वयात होणाऱ्या मधुमेहामध्ये पोटात स्वादुपिंडावर चरबी साठलेली असते. स्वादुपिंडामध्ये इन्सुलीन तयार होत असते. चरबीमुळे इन्सुलीनची संवेदनशीलता कमी होते. जीवनशैलीतील बदलांनी ही चरबी कमी झाली की इन्सुलीनची संवेदनशीलता वाढते आणि डायबेटीस ‘रिव्हर्स’ होतो.

म्हणजे इन्सुलीनचे इंजेक्शन बंद होते का?
हो, टाईप २ डायबेटीसमध्ये ज्यांना इन्सुलीन घ्यावे लागते, त्यांचे प्रथम इन्सुलीन बंद करता येते, त्याऐवजी काही दिवस गोळ्या खाव्या लागतात, नंतर या गोळ्याही बंद होतात. असे होण्यासाठी स्वादुपिंडावर असलेली चरबी कमी होणे अत्यंत आवश्यक असते.

आयुर्वेदिक औषधे आणि पंचकर्मामुळे काय होते?
औषध उपचारांमुळे इन्सुलीनची संवेदनशीलता वाढायला मदत होते.

मधुमेही रुग्णांसाठी उपचार
मधुमेही रुग्णांमध्ये काही रुग्णांची रक्तातील साखर अॅलोपॅथी औषधांच्या मदतीने सामान्य राहते तर काहींची औषधे चालू असतानासुद्धा प्रमाणापेक्षा जास्त वाढलेली असते. म्हणजे नियंत्रणात नसते. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात आणून डायबेटिस रिव्हर्स करणे गरजेचे आहे. समजा, तुमच्या रिपोर्टनुसार तुमचा डायबेटिस हा टाईप २ प्रकारचा असेल तर संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, तुमचा डायबेटिस रिव्हर्स होऊ शकतो.

आपल्याला औषधे आयुष्यभर घ्यायला आवडेल का...? नक्कीच नाही..., यासाठी ‘सीडीसी ट्रिटमेंट प्रोग्राम’ सुरू करा.

डायबेटिसमध्ये शरीरामध्ये दोन ठिकाणी बिघाड झालेला असतो. एक म्हणजे इन्सुलीनच्या कामात बिघाड (इन्सुलीन रेझीस्टन्स) आणि दुसरे म्हणजे पेशींमध्ये साठलेली चरबी (intracellular fat). हे सुधारण्यासाठी आपण खालील टप्प्यात काम करणार आहोत.

१) पंचकर्म - रक्तवाहिन्यांच्या व स्वादुपिंडाच्या (PANCREAS) आरोग्यासाठी विशिष्ट उपचार पद्धतीचा अवलंब करतो जी शरीरातून टॉक्सिन्स म्हणजे विषद्रव्य काढून टाकते व शारीरिक कष्टांबाबत रोग्याच्या सहनशक्तीत सुधारणा घडवून आणते.
सेंट्रिपेटल ओलिएशन- औषधी तेलाने संपूर्ण शरीराचे मर्दन.
थर्मल वैसोडायलेटेशन- औषधीयुक्त वाफेचा प्रयोग.
गुदद्वारामार्गे औषधांना सोडल्यास रक्तातील इन्सुलीनची मात्रा वाढते व इन्सुलीनचा प्रतिरोध कमी होतो.

२) आहार- प्रत्येक माणसाच्या प्रकृतीनुसार विशिष्ट आहार योजनेची व्यवस्था करतो. ज्यामुळे त्या रुग्णाच्या स्थितीनुसार जितकी ऊर्जा त्याला आवश्यक आहे तितकी त्याला प्राप्त होते. त्यामुळे त्याच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवायला मदत होते. ८०० कॅलरीचा आहार १२ आठवडे सेवन केल्यास शरीरात चरबी कमी होईल म्हणजेच इन्सुलीन प्रतिकार कमी होईल.
‘प्रमेह हायट कीट’- यामध्ये अतिशय सोपा तसेच रक्तातील साखर कमी होण्यासाठी आवश्यक असलेला ‘आहार’ आहे. रुग्णांनी किती व काय खावे यासाठी विचार करावाच लागणार नाही. वजन जास्त असणाऱ्यांसाठी महिन्यामध्ये ४ किलो वजन कमी होण्यास मदत होईल. हे ‘डायट किट’ ३ महिने वापरणे आवश्यक आहे. या तीन महिन्यांमध्ये रक्तातील साखर सुधारण्यास मदत तर नक्कीच होते व वजनही कमी होते.

३) अॅडव्हान्स्ड डायग्रोस्टिक- मधुमेह आणि हृदय रक्तवाहिन्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी कॉम्प्युटराईज्ड् स्ट्रेस टेस्ट, अँजिओ-डिफेन्डर आणि रक्त तपासण्या करण्यात येतात. चिकित्सा सुरू असताना औषधांचे प्रमाण कमी करण्यासाठी रक्तातील साखर वेळोवेळी तपासणे गरजेचे असते. यासाठी ‘ग्लुकोमीटर’ची आवश्यकता असते. तसेच सरासरी ३ महिन्यांची साखर आणि गरज पडल्यास आपणास परत ‘सीजीएमएस’सारख्या आधुनिक तपासण्याची गरज भासू शकते. रक्तातील साखर थोड्या थोड्या वेळाने बदलत असते. याचा अर्थ असा आहे की रक्तातील साखरसारखी बदलत राहणारी गोष्ट आहे. मग फक्त दिवसातून दोन वेळा साखर तपासून चालणार नसल्याने रक्तातील साखर दिवसात ९६ वेळा तपासून १४ दिवसांमध्ये १३४४ वेळा शुगर रिपोर्ट घेता येतो. या तपासणीचा उपयोग रक्तातील साखरेमध्ये होणारे बदल समजण्यासाठी आणि आहारातील, व्यायामातील व औषधांमधील आवश्यक बदल समजण्यासाठी होत असतो. ही तपासणी अतिशय सोपी असून, दैनंदिन कामे अगदी अंघोळ, व्यायाम, सगळं नीट सांभाळून करू शकता. १४ दिवसांनंतर साखरेचा रिपोर्ट मिळतो.

४) कार्डियो एक्सरसाईज सेशन्स डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांच्या हृदयाची कार्यक्षमता वाढवण्याचे विशेष व्यायाम शिकवण्यात येतात.

५) तोंडावाटे उपचार या उपचारांनी इन्सुलीननिर्मितीच्या प्रमाणात सुधारणा होते. इन्सुलीनचा प्रतिरोध कमी होतो. यात वनौषधींचं सेवन समाविष्ट आहे. ज्यांचे काहीही साईड इफेक्टस् नसतात.

उपचारांचे विशेष लाभ:
हृदयाची कार्यक्षमता वाढते, भूल देण्याची (अॅनेस्थेशिआ) आवश्यकता नाही व वेदनाशून्य उपचार,
दुष्परिणाम (साईड इफेक्टस्) न होणारी हर्बल चिकित्सा व औषधे, आयुर्वेदिक उपचारांच्या जोडीने व्यायाम, आहार, पथ्यांचा समावेश असलेला शास्त्रशुद्ध आणि परिणामकारक दिनक्रम, शस्त्रक्रियेशिवाय रक्तवाहिन्यांच्या आरोग्यात सुधारणा, विनाशस्त्रक्रिया हृदयविकारापासून सुटका.