रस्ता खराब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्ता खराब
रस्ता खराब

रस्ता खराब

sakal_logo
By

71589- मुख्य फोटो ६ कॉलम
---
71588, 71591, 71590

कोल्हापूरचे नाव एकदा
रसातळाला घालवाच!

बिंदू चौक ते उमा टॉकीज रस्ता; समस्यांचा कडेलोट

कोल्हापूर, ता. २८ ः अनवाणी चालणारे ठेचकळून पडतील अशी डांबरी खडी, ती टाळावी म्हटली तर बाजूला नीट चालताही येणार नाही, अशा पसरलेल्या मोठ्या खडीचा त्रास, खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात समोरून येणारे वाहन अंगावर येते की काय याची टांगती तलवार, धूळ इतकी की, ती नाकातोंडात जाऊ नये याची घ्यावी लागत असलेली दक्षता वेगळीच. याच समस्या पर्यटक, भाविकांचे स्वागत करत आहेत. पर्यटकांची मोठी संख्या असलेल्या बिंदू चौक ते उमा टॉकीजपर्यंतच्या रस्त्यावरील ही अवस्था कोल्हापूरचे नाव एका क्षणात रसातळाला घालवत आहे. तीन महिन्यांत या एका रस्त्याचे काम महापालिकेला करता येत नाही, यासारखे दुर्दैव नाही.

पर्यटनाला चालना द्यावी, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यापासून जिल्हा प्रशासनातील अधिकारी सांगतात; पण त्यासाठी आवश्‍यक असलेल्या सुविधा तुम्ही किती देता, त्यासाठी किती निधी दिला याचा विचार करण्याची वेळ आली आहे. शहरात येणाऱ्या पर्यटकांची वाहने बिंदू चौक, दसरा चौक, मिरजकर तिकटी, आझाद चौक, उमा टॉकीज या परिसरांत प्रथम येतात. तिथे ठिकठिकाणी खड्डे स्वागताला आहेतच. शिवाय वाहने उभी करून पद्मा टॉकीज ते बिंदू चौक आणि बिंदू चौक ते उमा टॉकीज येथील रस्त्यावरून पर्यटकांना चालता येणार नाही अशी स्थिती आहे. बिंदू चौक ते उमा टॉकीजपर्यंतच्या रस्त्यावर समस्यांचा कडेलोट आहे. चालता येत नाही, वाहनही नीट चालवता येत नाही, जखमीही होण्याचा धोका, धूळ अशा आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरणाऱ्या साऱ्या समस्या तिथे आहेत. गजबजलेल्या बिंदू चौकातही वेगळी परिस्थिती नाही. ‘कोल्हापूर म्हणजे हे सारे असेच’ असा मनात शिक्का मारून आपण पर्यटकांना पाठवत आहोत, याचे गांभीर्य लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांना जाणवते की नाही?