आजरा ः चराटी- शिंपी गटाचा मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः चराटी- शिंपी गटाचा मेळावा
आजरा ः चराटी- शिंपी गटाचा मेळावा

आजरा ः चराटी- शिंपी गटाचा मेळावा

sakal_logo
By

71616
आजरा ः मेळाव्यात बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे. यावेळी अशोक चराटी, जयवंतराव शिंपी, नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, विलास नाईक व अन्य मान्यवर.
------------

चराटींच्या पाठीमागे पक्षाची ताकद लावणार

समरजितसिंह घाटगे ः आजऱ्यात नूतन सरपंच व सदस्यांचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २८ ः आजरा नगरपंचायतीसह येणाऱ्या सर्व निवडणुका जिंकण्यासाठी अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक चराटी यांच्या पाठीशी पक्ष व शासनाची ताकद लावली जाईल, अशी ग्वाही भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिली. त्यांनी विकासकामांसाठी सरपंचांना निधी कमी पडू देणार नसल्याचेही सांगितले.
येथील अण्णा भाऊ सांस्कृतिक सभागृहात नूतन सरपंच व सदस्यांचा सत्कार चराटी व शिंपी गटाच्या वतीने झाला. या वेळी घाटगे बोलत होते. जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी, नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, विलास नाईक यांच्यासह प्रमख मान्यवर उपस्थित होते.
चराटी म्हणाले, ‘२७ पैकी २६ ग्रामपंचायतीचे सरपंच चराटी- शिंपी गटाचे आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत विजय आमचा आहे. आजरा शेतकरी संघाची निवडणूक लागली आहे. कार्यकर्त्यांनी जास्तीतजास्त ठराव जमा करावेत. शिंपी यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी डॉ. दीपक सातोसकर, सुरेश डांग, तानाजी देसाई, उपनगराध्यक्षा अस्मिता जाधव, मसणू सुतार उपस्थित होते. विजयकुमार पाटील यांनी स्वागत केले. अभिषेक शिंपी यांनी प्रास्ताविक केले.
....
चौकट-

कर्जमाफीवरून मुश्रीफांना टोला

‘शिंदे -फडणवीस सरकारने तातडीने पन्नास हजारांची अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली. मात्र, सध्या विरोधक दुसरी यादी कधी, अशी विचारणा करतात हे दुर्दैवी आहे. कागलच्या विद्यमान आमदारांनी तर सत्तेवर असताना कर्जमाफीचे फलक मतदारसंघात तीन वेळा लावले, असा टोला घाटगे यांनी आमदार मुश्रीफ यांचे नाव न घेता लगावला.