श्रीपतराव बोंद्र जयंतीनिमित्त कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीपतराव बोंद्र जयंतीनिमित्त कार्यक्रम
श्रीपतराव बोंद्र जयंतीनिमित्त कार्यक्रम

श्रीपतराव बोंद्र जयंतीनिमित्त कार्यक्रम

sakal_logo
By

श्रीपतराव बोंद्रे जयंतीनिमित्त
विविध उपक्रमांद्वारे अभिवादन
कोल्हापूर, ता. २८ : श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात माजी कृषी राज्यमंत्री श्रीपतराव बोंद्रे यांना विविध सामाजिक उपक्रमांद्वारे अभिवादन केले. यामध्ये रक्तदान शिबिर, निबंध लेखन स्पर्धा, बोंद्रे यांच्या जीवन कार्यावरील भित्तीपत्रकाचे उद्‌घाटन, जीवन कार्यावरील आणि शेतीविषयक ग्रंथांचे, नियतकालिकांचे प्रदर्शन, प्रतिमेचे पूजन उपक्रमांत समावेश होता.
प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, प्रा. डॉ. आर. डी. मांडणीकर यांनी प्रतिमेचे पूजन केले. एनएसएस, एनसीसी विभागातर्फे आणि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील रक्त संकलन विभागातर्फे शिबिर झाले. ३५ हून अधिक विद्यार्थी, प्राध्यापक, प्रशासकीय सेवकांनी रक्तदान शिबिरात भाग घेतला. प्राचार्य डॉ. शानेदिवाण यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. एनएसएस विभागप्रमुख प्रा. डॉ. के. एम. देसाई, एनसीसी विभागप्रमुख कॅप्टन डॉ. प्रशांत पाटील, प्रा. डॉ. अनिल बलुगुडे, सीपीआरच्या रक्तसंकलन अधिकारी डॉ. अस्मा, जयवंत कदम यांनी संयोजन केले.
कनिष्ठ विभागातर्फे निबंध लेखन स्पर्धेत ११ वी, बारावी कला वाणिज्य शाखेतील ३५ हून अधिक विद्यार्थ्यांनी श्रीपतराव दादांच्या जीवन कार्यावरील निबंधाचे लेखन केले. प्रा. पी. के. पाटील, प्रा. एम. टी. पाटील यांनी संयोजन केले. शिवाजी ग्रंथालयातर्फे शेतीविषयक संदर्भ ग्रंथांचे, नियतकालिकाचे प्रदर्शन झाले. प्राचार्य डॉ. शानेदिवाण, प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास भेट दिली. ग्रंथपाल डॉ. पांडुरंग पाटील, सौ. यु. यु. साळोखे, सौ. मंजिरी भोसले, सौ. ए. एफ. गावडे, सुहास टिपुगडे, बाळासाहेब इंगवले, दीपक गुरव, विजय लाड, अतुल कांबळे यांनी संयोजन केले. भित्तिपत्रकाचे अनावरण केले. मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. दीपक कुमार वळवी, प्रा. पी. के. पाटील, प्रा. एन. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी भिंतीपत्रकाचे निर्मिती केली. डॉ. पाटील यांनी स्वागत केले. चेअरमन मानसिंग बोंद्रे यांचे प्रोत्साहन मिळाले.