
गड-शेतकऱ्यांना मार्गदर्शन
फोटो क्रमांक : gad287.jpg
71663
लिंगनूर कसबा नूल : कृषीकन्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी परमेश्वरी पाटील, संतोष पाटील, राजशेखर पाटील, प्रमोद खांडेकर आदी.
--------------------------
लिंगनूरमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन
गडहिंग्लज, ता. 28 : लिंगनूर कसबा नूल (ता. गडहिंग्लज) येथे ग्रामीण कृषी कार्यक्रमातंर्गत शेतकरी व दूध उत्पादकांना रोशनबी शमनजी कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्यांनी मार्गदर्शन केले. साठवलेल्या धान्यात निर्माण होणारा दातेरी भुंगा, तांबडा भुंगा, चवळी भुंगा आदी किडींचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी घ्यावयाची दक्षतेबाबत प्रात्यक्षिकासह माहिती दिली.
धान्य साठवणूकीवेळी जैविक व रासायनिक खतांमधील फरक, त्याचे फायदे-तोटे, आरोग्यावर होणारे परिणामांची माहिती दिली. दयानंद शिंदे यांच्या शेताला कृषीकन्यांनी भेट देवून सिंचन पद्धतीचा वापर, त्याचे फायदे-तोटे, पाण्याची बचतीविषयी तर रायगोंडा पाटील यांच्या गोठ्यास भेट देवून दूध उत्पादनाचे फायदे, स्वच्छ दूध व जनावरांची घ्यावयाची काळजी व व्यवस्थान याविषयी मार्गदर्शन केले. कृषीकन्या स्वप्नाली बिरंबोळे, स्नेहल कांबळे, ऋतुजा घाटगे, दिपाली चौगुले, श्रद्धा खंडाळे, पुष्पा शिंदे यांनी मार्गदर्शन केले. सरपंच परमेश्वरी पाटील, संतोष पाटील, राजशेखर पाटील, प्रमोद खांडेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.