गड-करंबळी शाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड-करंबळी शाळा
गड-करंबळी शाळा

गड-करंबळी शाळा

sakal_logo
By

फोटो क्रमांक : gad288.jpg
71670
करंबळी : सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना प्रा. पी. डी. पाटील. शेजारी पदाधिकारी, शिक्षक.
---------------------------
करंबळीत सावित्रीबाई फुले सप्ताह
गडहिंग्लज : करंबळी (ता. गडहिंग्लज) येथील सावित्रीबाई फुले हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सप्ताहाचा प्रारंभ झाला. प्रा. पी. डी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पी. आर. माळी अध्यक्षस्थानी होते. प्रा. पाटील म्हणाले, ‘शिक्षण समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. सावित्रीबाई फुले यांचे कार्य प्रेरणादायी आहे.’ यावेळी अक्षय माळी, आर. एस. पाटील, पी. आर. जाधव, एन. आर. शेडेकर, संजय माळी, ईश्वर दावणे, नंदकुमार सुतार उपस्थित होते. जयसिंग कांबळे यांनी स्वागत, प्रभावती मुगळी यांनी सूत्रसंचालन, सचिन पन्हाळकर यांनी आभार मानले. सप्ताहात क्रीडा स्पर्धा, वाहतुकीचे नियम व सुरक्षा, पोक्सो कायदा याबाबत मार्गदर्शन, मातकाम कलाकौशल्य, प्रथमोपचार पद्धती, संविधानाचा जागर होईल. वनभोजन व किल्ले सामानगड येथे पर्यावरण शिबिरही आहे.