कृषी उत्पादन खच निश्‍चित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृषी उत्पादन खच निश्‍चित
कृषी उत्पादन खच निश्‍चित

कृषी उत्पादन खच निश्‍चित

sakal_logo
By

उत्पन्न ४ लाख;
खर्च पावणेतीन लाख
.......
-आडसाल उसाचा हेक्टरी ताळेबंद
-कृषी विद्यापीठाचा अहवाल

सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ : उसाला उत्पादन खर्चानुसार दर मिळाला पाहिजे, अशी वारंवार मागणी होते. त्यानुसार आडसाल उसाला हेक्टरी २ लाख ९५ हजार ८१३ रुपये खर्च येतो, तर यातून ४ लाख १८ हजार ६८५ रुपये उत्पादन मिळत असल्याचा निष्कर्ष राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने काढला आहे.
जिल्ह्यात ऊस हे प्रमुख पीक. येथील वातावरण भात, भुईमूग, सोयाबीन, नाचणीसह उसाला पोषक आहे. इतर पिकांप्रमाणे उसालाही उत्पादन खर्चानुसार दर मिळवा, ही मागणी विविध संघटना, शेतकऱ्यांकडून होते. दरम्यान, याबद्दल महात्मा फुले कृषी विद्यापीठाने २०२१-२०२२ मध्ये हेक्टरी उत्पादन खर्चासह आडसाल, पूर्व हंगामी, सुरु व खोडवा उसाला हेक्टरी किती उत्पादन मिळते आणि किती खर्च येतो, याचा अहवाल तयार केला आहे. हा खर्च आकारताना प्रत्यक्ष खर्च आणि घरच्या लोकांनी काम केलेल्या सदस्यांची मजुरीही धरली आहे. खेळते भांडवल, त्यावरील व्याज, शेती अवजारावरील घसारा आणि इतर खर्च, जमीन भाडे, स्थिर भांडवलावरील व्याज आणि घरचे मजूर यांच्या खर्चाचाही समावेश आहे. भांडवलामध्ये मजुरी, बैल व ट्रॅक्टर मशागत, बियाणे, सेंद्रिय, जैविक व रासायनिक खते, पीक देखभाल खर्च, आकस्मिक खर्च, शेती अवजार दुरुस्ती, विम्याची रक्कमही खर्चात धरली आहे. या सर्व खर्चाचा विचार करून आडसाल ऊस लागण, पूर्व हंगामी ऊस, सुरुचा ऊस व खोडवा ऊस अशा चार प्रकारच्या उसाचे उत्पादन आणि खर्च वेगवेगळा काढला आहे. प्रत्यक्ष खर्च, घरचे मजूर असतील, तर २५ टक्के खर्च कपात केला आहे. दरम्यान, यात ज्या-त्या जिल्ह्यात फरक असू शकतो.
....
चौकट
अहवाल असा
प्रकार* प्रत्यक्ष खर्च* घरच्या मजुरांसह खर्च* प्रत्यक्ष उत्पादन
आडसाली* २९५८१३*२९१७५६*४१८६८५
पूर्व हंगामी*२६३२३९*२५९६२६*३५६७४७
सुरु ऊस*२४३३२६*२३९३३८*३२१३७८
खोडवा ऊस*१७२६३३*१६९४९९*२९३८१४