रत्नागिरी ः महाराष्ट्राच्या कुमारांचा बादफेरीत प्रवेश तर मुलींची उपउपांत्य फेरीत धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः महाराष्ट्राच्या कुमारांचा बादफेरीत प्रवेश तर मुलींची उपउपांत्य फेरीत धडक
रत्नागिरी ः महाराष्ट्राच्या कुमारांचा बादफेरीत प्रवेश तर मुलींची उपउपांत्य फेरीत धडक

रत्नागिरी ः महाराष्ट्राच्या कुमारांचा बादफेरीत प्रवेश तर मुलींची उपउपांत्य फेरीत धडक

sakal_logo
By

-rat२८p२८.jpg
71686
रत्नागिरी ः राष्ट्रीय खो-खो स्पर्धेतील मुलींच्या आणि मुलांच्या सामन्यातील चुरशीचा क्षण.

राष्ट्रीय खो-खो स्पर्धा
---लोगो

महाराष्ट्राचे कुमार बादफेरीत;
मुली उपउपांत्य फेरीत दाखल
---
मणिपूर, हरियानाचा केला पराभव; सूरज झोरे, गणेश बोरकर, अश्विनी शिंदे चमकल्या
रत्नागिरी, ता. २८ ः पश्चिम बंगालमधील बन्सबेरिया (जि. होगळी) येथे सुरू असलेल्या ४१ व्या राष्ट्रीय कुमार मुली खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र कुमार संघाने बादफेरीत प्रवेश केला; तर मुलींनी उपउपांत्य फेरी गाठली.
बन्सबेरिया येथील खामरपारा सिशू संघ मैदानावर हे सामने सुरू आहेत. कुमारांच्या पहिल्या सामन्यात महाराष्ट्राने झारखंडचा २०-९ असा एक डाव ११ गुणांनी दणदणीत पराभव केला. महाराष्ट्र संघातर्फे सूरज झोरे, गणेश बोरकर, निखिल, विवेक ब्राह्मणे यांनी चांगला खेळ केला. दुसऱ्या साखळी सामन्यात महाराष्ट्राने मणिपूरचा २१-५ असा एक डाव १६ गुणांनी धुव्वा उडवत अ गटात अव्वल स्थान पटाकावत बादफेरीत प्रवेश मिळविला.
मुलींच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्राने हरियानाचा ११-१३ असा एक डाव आठ गुणांनी पराभव केला. महाराष्ट्राच्या अश्विनी शिंदे, प्रीती काळे, संपदा मोरे, वृषाली भोये व कल्याणी काळे यांनी विजयात महत्त्वाची कामगिरी केली. तत्पूर्वी, मुलींच्या गटातील साखळी सामन्यात महाराष्ट्राने झारखंडचा १८-६ असा एक डाव १२ गुणांनी धुव्वा उडवत अ गटात अव्वल स्थान पटकवत बादफेरी गाठली. यात प्रणाली काळे, सानिका चाफे, दीपाली राठोड, पायल पवार यांनी चांगला खेळ केला. मुलींमध्ये अत्यंत चुरशीच्या झालेल्या साखळी सामन्यात पश्चिम बंगालने दिल्लीचा ११-९ असा दोन गुणांनी पराभव केला.