सत्यजीत कदम पत्रकार परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सत्यजीत कदम पत्रकार परिषद
सत्यजीत कदम पत्रकार परिषद

सत्यजीत कदम पत्रकार परिषद

sakal_logo
By

डी. वाय. पाटील ग्रुपच्या
काही मिळकतींना अल्प घरफाळा

सत्यजित, सुनील कदमांचा आरोप ः आमदार पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी

कोल्हापूर, ता. २८ ः ‘डी. वाय. पाटील ग्रुपमधील काही मिळकतींचा मालक वापर दाखवून, काहींचा विनापरवाना वापर करून, काहींचा भोगवटा प्रमाणपत्र न घेता वापर करून महापालिकेचा कोट्यवधींचा घरफाळा बुडवला गेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातून निवडून येऊन प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या जनतेशी प्रतारणा करणाऱ्या आमदार सतेज पाटील यांनी या प्रकरणी नैतिक जबाबदारी स्वीकारून आमदारकीचा राजीनामा द्यावा’, अशी मागणी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सत्यजित कदम व माजी महापौर सुनील कदम यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
सत्यजित कदम व सुनील कदम पुढे म्हणाले, ‘घरफाळा भरला असला तरी या ग्रुपमधील काही मिळकतींना अल्प घरफाळा आकारला जात होता. कसबा बावड्यातील व्यावसायिक वापर असलेल्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र घेतलेले नसताना वापर करून घरफाळा भरला नव्हता. एक मिळकत भाडेतत्त्वावर चढवूनही मालक वापर दाखवून कोट्यवधींचा घरफाळा बुडवला आहे. याबाबत दोन वर्षांपासून पाठपुरावा केला. राजकीय दबावाखाली असलेल्या महापालिकेने उशिरा का होईना, घरफाळा वसुलीकरिता नोटीस लागू करून अंतिम बिले दिली आहेत, हे आमच्या लढ्याचे यश आहे. या ग्रुपकडून देय असलेल्या घरफाळ्याची पै-पै वसूल होईपर्यंत हा लढा सुरूच ठेवणार आहे.’