विक्रेता चषक क्रिकेट स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विक्रेता चषक क्रिकेट स्पर्धा
विक्रेता चषक क्रिकेट स्पर्धा

विक्रेता चषक क्रिकेट स्पर्धा

sakal_logo
By

71706, 71705
...........

वृत्तपत्र विक्रेता चषक
कावळा नाका डेपो संघाकडे
-
राजारामपुरी वृत्तपत्र विक्रेता संघाकडे उपविजेतेपद
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ ः येथील शास्त्रीनगर मैदानावर अत्यंत चुरशीने झालेल्या वृत्तपत्र विक्रेता चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कावळा नाका डेपो क्रिकेट संघाने राजारामपुरी विक्रेता क्रिकेट संघाचा सहा गडी राखून पराभव करीत विजेतेपद मिळविले. विजेत्या संघास पाच हजार रुपये व आकर्षक ट्रॉफी बक्षीस म्हणून देण्यात आले. उपविजेत्या राजारामपुरी वृत्तपत्र विक्रेता संघास तीन हजार रुपये व आकर्षक ट्रॉफी देण्यात आली. उत्तेजनार्थ बक्षीस छत्रपती संभाजीनगर वृत्तपत्र विक्रेता डेपो संघ, भाऊसिंगजी डेपो (महानगर), मिसळ ग्रुप यांना देण्यात आले.
दरम्यान, अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजारामपुरी संघाने सहा षटकांमध्ये ५२ धावांचे आव्हान ठेवले. कावळा नाका संघाने पाच षटकांमध्ये ते आव्हान पूर्ण केले. अंतिम सामन्यात ‘मॅन ऑफ दि मॅच’चा मानकरी कावळा नाका डेपोचा शुभम मोरे ठरला; तर ‘मॅन ऑफ दि सीरिज’चा बहुमान राजारामपुरी संघाचा तंजिल अन्सारी याने पटकावला.
सागरमाळ स्पोर्टस् असोसिएशनचे अध्यक्ष काकासाहेब पाटील, सचिव किरण खतकर, राजारामपुरी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष असिफ मुल्लाणी, उपाध्यक्ष महेश घोडके, संघटक रमेश जाधव, ग्रामीण उपाध्यक्ष संदीप ब्रह्मदंडे, कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष किरण व्हनगुत्ते, कोल्हापूर शहर महानगर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष रवी लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्‍घाटन झाले. राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सचिव विकास सूर्यवंशी, उद्योजक महेश उत्तुरे, मोरेवाडी ग्रामपंचायत सदस्य आशिष पाटील, प्रा. सुरेश ढोणुक्षे, राजू लाड, शंकरराव चेचर, मारुती नवलाई, किरण व्हणगुत्ते आदी उपस्थित होते.
उमेश माने, साई गुरव यांनी प्रमुख पंच म्हणून काम पाहिले. रोहन मछले, संदीप गिरीगोसावी यांनी समालोचन केले. राजारामपुरी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सचिव रत्नाकर शिंदे, सौरभ लाड, करण सावेकर, विनायक कांबळे, उदय मोरे, श्रीकांत सावेकर, स्वप्नील माने, तंजील अन्सारी, हिंदुराव कदम, शैलेंद्र भोसले यांचे विशेष सहकार्य मिळाले. चाटे शिक्षण समूहातर्फे बक्षिसे देण्यात आली. आशिष पाटील, दुर्वास कदम, आझम जमादार, यशवंत अॅकॅडमीचे श्री. काशीद, ‘केकव्हिला’चे रावसाहेब वंदुरे, हर्ष ऑप्टिक्स, अनघा ज्वेलर्स, जसवंत स्वीट, सुजित लाड, राजेंद्र भोसले, अजित ठाणेकर यांचेही सहकार्य मिळाले.