सदर बाजारात दोन कुटुंबात हाणामारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सदर बाजारात दोन कुटुंबात हाणामारी
सदर बाजारात दोन कुटुंबात हाणामारी

सदर बाजारात दोन कुटुंबात हाणामारी

sakal_logo
By

सदर बाजारात दोन कुटुंबांत हाणामारी

कोल्हापूर ः किरकोळ कारणावरून सदर बाजारात दोन कुटुंबांत झालेल्या हाणामारीतून परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. मंगळवारी ही घटना घडली असून, त्याची नोंद रात्री उशिरा शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली. पोलिसांनी सांगितले, की सदर बाजारातील दाभाडे गल्लीत किरकोळ कारणावरून वाद झाला. यातून हाणामारी झाली. याबाबत संतोष अशोक चौगुले (वय ४५, रा. दाभाडे गल्ली) आणि उत्तम मनोहर पोवार (४२, रा. सदर बाजार, कोल्हापूर) यांनी रात्री उशिरा शाहूपुरी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दिली. यामध्ये संतोष चौगुले यांच्या फिर्यादीनुसार पिंटू ऊर्फ उत्तम मनोहर पोवार, ज्योती उत्तम पोवार, कार्तिकी उत्तम पोवार, बबन मुरलीधर सोनीकर यांच्यासह अनोळखी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच उत्तम पोवार यांच्या फिर्यादीनुसार संतोष अशोक चौगुले आणि कोमल संतोष चौगुले या दोघांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.