घरफाळ्यासाठी विशेष कॅम्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरफाळ्यासाठी विशेष कॅम्प
घरफाळ्यासाठी विशेष कॅम्प

घरफाळ्यासाठी विशेष कॅम्प

sakal_logo
By

घरफाळा लावण्यासाठी
जानेवारीत विशेष कॅम्प

कोल्हापूर, ता. २८ : दोन वर्षांमध्ये बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र व भोगवटा प्रमाणपत्र घेऊनही अद्याप कर आकारणी झालेली नाही, अशांना घरफाळा आकारणीसाठी विशेष कॅम्पचे आयोजन केले आहे. ३ ते ६ जानेवारीदरम्यान सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत कॅम्प आयोजित केला आहे.
गांधी मैदान विभागीय कार्यालयात मंगळवारी (ता. ३), शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयात बुधवारी (ता. ४), राजारामपुरी विभागीय कार्यालयात गुरुवारी (ता. ५), ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयात शुक्रवारी (ता. ६) मिळकतधारकांनी प्रॉपर्टी कार्ड, सात-बारा उतारा, इंडेक्स उतारा, खरेदीपत्र, कब्जेपट्टी, लाईट बिल, बांधकाम परवानगी व भोगवटा प्रमाणपत्र घेऊन यावे. अपार्टमेंट असल्यास बिल्डर व डेव्हलपर्सचे नाव व पत्ता असलेली कागदपत्रे व ज्या मिळकतींना घरफाळा येत होता पण आता येत नाही अशा मिळकतधारकांनी घरफाळा भरल्याच्या पावतीसह अर्ज सादर करावेत.