
गड-जखमीचा मृत्यू
71730 : रामा फुटाणे
-------
फांदी पडून जखमी
झालेल्याचा मृत्यू
गडहिंग्लज, ता. २८ : संकेश्वर - बांदा महामार्गात अडथळा ठरणारे झाड तोडताना फांदी अंगावर पडून गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा आज मृत्यू झाला. रामा लगमाना फुटाणे (वय ४७, रा. हसुरचंपू, ता. गडहिंग्लज) असे मृताचे नाव आहे. अपघाताची ही घटना दुंडगे (ता. गडहिंग्लज) गावाजवळ १९ डिसेंबरला घडली होती. महामार्गासाठी झाडांची तोड सुरू आहे. दुंडगे गावाजवळील वडाचे झाड तोडण्याचे काम सुरू होते. त्यासाठी वाहतूकही थांबविली होती. दरम्यान, हसूरचंपू येथील रामा फुटाणे हे पत्नीसह मोटारसायकलने गडहिंग्लजकडे येताना तेही याठिकाणी थांबले. त्याचवेळी अचानक झाडाची भली मोठी फांदी अंगावर पडल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर गेल्या आठवडाभरापासून कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असताना आज दुपारी दीडच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, विवाहित मुलगी, आई, वडील असा परिवार आहे.