क्रिकेट स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रिकेट स्पर्धा
क्रिकेट स्पर्धा

क्रिकेट स्पर्धा

sakal_logo
By

लोगो-
संजय देसाई स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा
-
71751
इचलकरंजी ः (कै.) संजय देसाई स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धेच्या उद्‍घाटनप्रसंगी मान्यवर.
-
71753
-

फायटर्स अ, ब संघ
पुढील फेरीत दाखल
---
मुस्तकिन पठाणचे २८ धावांत पाच बळी
कोल्हापूर, ता. २८ ः येथील फायटर्स क्लब आयोजित (कै.) संजय देसाई स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धेत फायटर्स अ व ब संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवून पुढील फेरीत प्रवेश केला.
इचलकरंजी येथील राजाराम स्टेडियमवर आयोजित या स्पर्धेचे उद्‍घाटन उद्योजक अविनाश चिकणीस यांच्या हस्ते झाले. या वेळी शिवाजी निंबाळकर, पप्पू गवळी, प्रा. सजय पाठारे, राजू पठाण, उमेश माने, विनायक बावडेकर आदी उपस्थित होते.
पहिल्या सामन्यात फायटर्स ब संघाने रमेश कदम क्रिकेट ॲकॅडमी संघासमोर निर्धारित २० षटकांत १३८ धावांचे उद्दिष्ट ठेवले होते. पण, उत्तरादाखल खेळणारा कदम क्रिकेट ॲकॅडमी संघ १७ षटकांत ९८ धावांवर गारद झाला. फायटर्स ब संघाच्या मुस्तकिन पठाण याने २८ धावांत पाच बळी घेत विजयात मोलाचा वाटा उचलला, तर दर्शन निंबाळकरने एक बळी घेतला.
दुसऱ्या सामन्यात फायटर्स अ संघाने २० षटकांत १६८ धावांचे उद्दिष्ट नागाळा पार्क क्रिकेट संघासमोर ठेवले होते. पण, हा संघ सर्व बाद ८५ धावाच करू शकला. अ संघाने हा सामना ८३ धावांनी जिंकला. अ संघाच्या अर्शद पठाणने १८ धावांत तीन बळी घेतले.