खोदाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खोदाई
खोदाई

खोदाई

sakal_logo
By

गॅस पाईपलाईनसाठी खोदलेल्या
रस्‍त्यांसाठी २० कोटी जमा

कोल्हापूर, ता. २८ ः गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी शहरातील सुमारे १८० किलोमीटर लांबीचे रस्ते टप्प्याटप्प्याने खोदले जात आहेत. हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीने या रस्त्यांच्या पुनर्बांधणीसाठी २० कोटी ७५ लाख महापालिकेकडे जमा केले आहेत. दोन महिन्यांत या रस्त्यांची महापालिकेकडून दुरुस्ती केली जाणार आहे.
शहरातील रस्त्यांची लांबी १०३१ किलोमीटर आहे. ७० टक्के रस्ते सध्या खड्डेमय आहेत. त्यातच आता गॅस पाईपलाईनसाठी ते खोदले जाणार आहेत. भूमिगत गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू झाले असून, ई वॉर्डमध्ये प्रथम गॅस पुरवठा होणार आहे. त्यासाठी २२० किलोमीटर पाईपलाईनसाठी दिलेल्या प्रस्तावांपैकी १८० किलोमीटर पाईपलाईन टाकण्यास मंजुरी दिली आहे. रुईकर कॉलनी, शिवाजी पार्क, राजारामपुरी, टाकाळा, शाहूपुरी भागांत रस्ते खोदले आहेत. रस्ते खोदण्यासाठी परवानगी घेऊन रस्त्यांच्या पुनर्बांधणीसाठी पैसे महापालिकेकडे भरावे लागतात. १५ दिवसांत खोदाईचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. ते रस्ते पूर्ववत करण्यात येणार आहेत. रस्ते दुरुस्तीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, रस्ते बनवले जातील, असे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितले.