
कबनूर हायस्कूलच्या खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड
03143
कबनूर : येथील कबनूर हायस्कूलच्या खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल सत्कार करताना संस्थेचे अध्यक्ष जयकुमार कोले व इतर.
कबनूर हायस्कूलच्या खेळाडूंची
विभागीय स्पर्धेसाठी निवड
कबनूर, ता. २९ : येथील कबनूर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील खेळाडूंनी वारणानगर येथे झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत यश मिळवले. या खेळाडूंची सातारा येथे होणाऱ्या विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
हायस्कूलच्या अथर्व सातपुते याने १४ वर्षांखालील मुले गटात उंच उडीत प्रथम क्रमांक, तर पृथ्वीराज चव्हाण यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. १४ वर्षांखालील मुलींच्या गटात उंच उडीमध्ये धनश्री लिंबाजीने प्रथम क्रमांक, सृष्टी कांबळेने द्वितीय क्रमांक, लांब उडीमध्ये सृष्टी कांबळेने प्रथम क्रमांक मिळवला. १४ वर्षांखालील मुलींच्या ८० मीटर हार्डल्समध्ये धनश्री लिंबाजीने द्वितीय क्रमांक मिळवला. १७ वर्षांखालील मुले गटात उंच उडीमध्ये श्रेयस भेंडेकरने प्रथम क्रमांक, विशाल सिंहने द्वितीय क्रमांक मिळवला. १९ वर्षांखालील मुले गटात उंच उडीत शुभम शिंदेने प्रथम क्रमांक, रेहान पटाईत याने द्वितीय क्रमांक मिळवला. १९ वर्षांखालील मुली गटात उंच उडीमध्ये श्रेया मानेने प्रथम क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष जयकुमार कोले, उपाध्यक्ष राजाराम वाकरेकर, सचिव सुभाष काडाप्पा यांचे प्रोत्साहन, तर मुख्याध्यापक पी. डी. चौगुले, पर्यवेक्षक एस. जी. उगारे, क्रीडा शिक्षक सुभाष माने यांचे मार्गदर्शन लाभले.