रामोशी समाज्याच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा करू-शरद पवार यांची शिष्टमंडळाला ग्वाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रामोशी समाज्याच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा करू-शरद पवार यांची शिष्टमंडळाला ग्वाही
रामोशी समाज्याच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा करू-शरद पवार यांची शिष्टमंडळाला ग्वाही

रामोशी समाज्याच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा करू-शरद पवार यांची शिष्टमंडळाला ग्वाही

sakal_logo
By

02407
नवी दिल्ली : येथे शरद पवार यांच्यासह वसंतराव चव्हाण, मुक्ता चव्हाण, प्रा. रविकिरण नाईक, डॉ. अरुंधती नाईक, शरद भोसले, मीनाताई भोसले आदी.

रामोशी समाजाच्या प्रश्नांसाठी
पाठपुरावा करू : शरद पवार
खोची : रामोशी, बेरड-बेडर समाजाच्या प्रश्नांसाठी विशेष लक्ष देऊन प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिली. नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण व समाजाच्या शिष्टमंडळाने नवी दिल्ली येथे पवार यांची भेट घेऊन क्रांतिकारी रामोशी बेरड-बेडर समाजाच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा केली. शरद पवार यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी झालेल्या चर्चेमध्ये सामाजिक व आर्थिक स्तर उंचावावा, याबाबत चर्चा झाली. या वेळी महिला आघाडीप्रमुख मुक्ता चव्हाण, प्रा. रवीकिरण नाईक, डॉ. अरुंधती नाईक, शरद भोसले, मीनाताई भोसले, राया नाईक, सई चव्हाण आदी उपस्थित होते.