मार्ड संप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मार्ड संप
मार्ड संप

मार्ड संप

sakal_logo
By

निवासी डॉक्टर नव्या वर्षात जाणार संपावर

सीपीआरमधील सुमारे ८० निवासी डॉक्टरांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० ः राज्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या मानधनात वाढ करावी, या मागणीसाठी राज्यातील निवासी वैद्यकीय संघटनेने (मार्ड) येत्या १ जानेवारीपासून बेदमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार येथील सीपीआर रुग्णालयातील जवळपास ८० निवासी डॉक्टर संपावर जाणार असल्याने रुग्णसेवेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागाकडे एमबीबीएसचे शिक्षण घेतल्यानंतर पुढील उच्च वैद्यकीय शिक्षणासाठी अर्थात एमडी किंवा एमएसचे शिक्षण घेणारे विद्यार्थी डॉक्टर शासकीय रुग्णालयात वैद्यकीय उपचार सेवेत मदत करतात. त्यांना राज्यभरातील जिल्हा शासकीय रुग्णालयात दरमहा किमान ७५ हजार रुपयांचे मानधन देण्यात येते. बहुतांशी रुग्णांवर उपचार सेवा देण्याचे काम हेच विद्यार्थी वैद्यकीय प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली करीत असतात. अशा प्रकारची सेवा मुंबईमध्येही देण्यात येते. तेथील निवासी डॉक्टरांना एक लाख रुपयांचे मानधन आहे. त्यामुळे राज्यभरातील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय उपचार सेवेचा ताण सोसून काम करणाऱ्या निवासी डॉक्टरांनाही एक लाख रुपयांचे मानधन द्यावे, या मागणीसाठी हा संप होणार आहे.
कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात जवळपास ८० निवासी डॉक्टर्स कार्यरत आहेत. तेही याच मागणीसाठी संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. हा संप राज्यव्यापी असल्याने त्यात येथील डॉक्टर्स ही सहभागी होणार आहेत. त्यामुळे कोल्हापुराच्या सीपीआरमधील जवळपास ४० टक्के वैद्यकीय उपचार सेवेत खोळंबा होणार आहे. येत्या १ जानेवारीपर्यंत निवासी डॉक्टर्सच्या मागणीचा राज्य शासनाने सकारात्मक विचार करावा, अशी मागणी राज्यस्तरीय निवासी डॉक्टर्सच्या समितीने केली आहे. ही मागणी मान्य झाली तरच कदाचित हा संप मागे घेण्यात येईल. मात्र, तूर्त यापूर्वीही अशाच मागणीसाठी संप झाला होता. मात्र शासनाने या डॉक्टारांची मागणी मान्य केलेली नाही, त्यामुळे संपाचा इशारा देण्यात आला आहे.
...

संप झाल्यास गंभीर पेच
सीपीआरमध्ये एकूण १६ विभागात, तसेच २२ कक्षांत निवासी डॉक्टर्स २४ तास वैद्यकीय सेवा देतात. हेच डॉक्टर्स संपावर गेले, तर रोजच्या नियमित रुग्णांची तपासणी, तसेच ॲडमिट असलेल्या रुग्णांच्या उपचार सेवेवर विपरीत परिणाम होणार आहे. केवळ ४० वैद्यकीय प्राध्यापक रोजच्या सहाशेवर रुग्णांना उपचार सेवा देऊ शकत नाहीत. त्यामुळे हा संप झाल्यास गंभीर पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.