वस्त्रनगरीत दर्जेदार सेवेसाठी हॉटेल व्यावसायिक तत्पर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वस्त्रनगरीत दर्जेदार सेवेसाठी हॉटेल व्यावसायिक तत्पर
वस्त्रनगरीत दर्जेदार सेवेसाठी हॉटेल व्यावसायिक तत्पर

वस्त्रनगरीत दर्जेदार सेवेसाठी हॉटेल व्यावसायिक तत्पर

sakal_logo
By

पुरवणी संकलन
पंडित कोंडेकर
ऋषीकेश राऊत
गजानन खोत
--

नववर्ष स्वागत...हॉटेल विशेष -------पुरवणी शीर्षक

वस्त्रनगरीत दर्जेदार सेवेसाठी हॉटेल व्यावसायिक तत्पर

इचलकरंजी शहर आणि परिसरात हॉटेल व्यवसाय गेल्या काही वर्षांत बहरला आहे. सुरुवातीच्या काळात अगदी मर्यादित असलेल्या या व्यवसायाने पुन्हा एकदा गरुड भरारी घेतली आहे. गुणवत्तापूर्वक व दर्जेदार सेवेमुळे येथील अनेक हॉटेल व्यवसायांनी आपला चांगला जम बसवला आहे. खवय्यांच्या सेवेसाठी शहरातील अंतर्गत भागासह शहरात येणाऱ्या सर्वच मार्गांवर अनेक हॉटेल सज्ज आहेत. खाद्य संस्कृतीची परंपरा जोपासण्याचे काम वस्त्रनगरीतील हॉटेल व्यावसायिक प्रामाणिकपणे करीत आहेत. कौटुंबिक सोहळा साजरा करण्यासाठी प्रशस्त अशा हॉटेलची निवड केली जाते. त्यादृष्टीनेही अनेक हॉटेल व्यावसायिकांनी बदल केले आहेत. सरत्या वर्षाला निरोप देणे आणि नवीन वर्षाचे स्वागत करणे, हा अनेकांच्या दृष्टीने एक संस्मरणीय क्षण असतो. त्यादृष्टीने हॉटेल व्यावयासिकांनीही जय्यत तयारी केली आहे.
------
इचलकरंजी शहर औद्योगिक शहर म्हणून परिचित आहे. येथे संस्थान काळापासून वस्त्रोद्योगाला भरभराट होत राहिली. त्यामुळे शहराचा विस्तार वाढत गेला. या उद्योगात येणाऱ्या कामगारांची भूक भागवण्याचे काम त्या काळी घरगुती खानावळींच्या माध्यमातून झाले. अलीकडे तर घरगुती मांसाहारी खानावळींची संख्या भरपूर वाढली आहे. अशा ठिकाणी मांसाहरी जेवणासाठी खवय्यांची पहिली पसंती राहिली. त्यासाठी गांधी कॅम्प हा परिसर प्रसिद्ध आहे. अनेक नामवंत व्यक्ती इचलकरंजीत आल्यास त्यांची या परिसराला नक्की भेट ठरलेली आहे. गांधी कॅम्पपासून सुरू झालेल्या घरगुती मांसाहारी खानावळीची संकल्पना आता शहरातील सर्वच भागांत पसरली आहे. दुसरीकडे शहरातील हॉटेल व्यवसायही वाढत गेला. पूर्वी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत सुसज्ज हॉटेलची संख्या होती. मात्र, अलीकडच्या काळात हॉटेल व्यवसायाने कात टाकली आहे. प्रशस्त इमारतीत अनेक व्यावसायिकांनी हॉटेल सेवा सुरु केली आहे. जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्यासाठी हॉटेल चालक व मालकांचे प्रयत्न सुरू आहेत. ‘अतिथी देवो भव’ या उक्तीप्रमाणे ग्राहकांना तत्पर सेवा देण्यासाठी हॉटेल व्यावसायिक कार्यरत आहेत.
अलीकडे खाद्यपदार्थांमधील नावीन्यपूर्णतेमुळे खवय्यांची पाऊले आठवड्यातून एकदा तरी हॉटेलकडे वळत आहेत. वाढदिवस, बढती, यश, निवड असे विविध प्रसंग संस्मरणीय करण्यासाठी आता हॉटेलचीच निवड केली जाते. हॉटेल व्यावसायिकांनीही हा बदल स्वीकारला आहे. त्यासाठी आवश्यक सुविधा अशा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे आता कुटुंबासह हॉटेलमध्ये आनंद सोहळा साजरा करण्यावर भर दिला जातो. खवय्यांचे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी हॉटेल व्यावसायिक स्वच्छतेचे निकष पाळताना दिसत आहेत. कारण आज ग्राहकही चोखंदळ झाला आहे. त्यामुळे आता स्वच्छतेवर भर देण्यात येत असल्याचे या व्यवसायातून दिसून येत आहे. नावीन्यपूर्णता ही बाब या व्यवसायास महत्त्वाची आहे. त्यामुळे आजही वेगवेगळ्या पदार्थांसाठी वेगवेगळ्या रेस्टॉरंटची ओळख बनली आहे. व्यावसायिकांनीही काळाप्रमाणे बदल स्वीकारला असल्याने आज हा व्यवसाय भरभराटीला आला आहे. नवीन पिढी या व्यवसायात गतीने पुढे येताना दिसत आहे. किंबहुना अन्य क्षेत्रापेक्षा यामध्ये करिअर करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. केवळ पारंपरिक पद्धतीने व्यवसाय न करता त्यातील वेगळेपण जोपासण्याची नवीन परंपरा या क्षेत्रात समोर येत आहे.
या व्यवसाय अंतर्गत अनेक सेवा - सुविधा दिल्या जातात. नियमावलींचा योग्य वापर करण्यावर व्यावसायिक भर देताना दिसून येत आहे. त्यामुळे या व्यवसायाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. इतर व्यवसायांप्रमाणे या व्यवसायातही स्पर्धा आहे; पण ही स्पर्धा निकोप ठेवण्यावर भर दिला आहे. त्यामुळे अंतर्गत संघर्ष कधी दिसून आला नाही. उद्योगनगरी असल्याने विविध राज्यांतून व्यवसायाच्या निमित्ताने अनेक अतिथी येत असतात. त्यांच्या निवासाची चांगली सुविधा अनेक ठिकाणी उपलब्ध आहे. अगदी माफक दरातही ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. व्यवसाय करताना अनेक संकटे येत असतात; पण त्यावर मात करीत पुढे जाण्याचे काम येथील हॉटेल व्यावसायिकांनी केले आहे. कोरोनासारख्या संकटाचा सर्वच क्षेत्राला फटका बसला. हॉटेल व्यावसायिकही या संकटातून सुटले नाहीत. मोठी आर्थिक गुंतवणूक असतानाही शासनाच्या आदेशाचे पालन करीत आपला व्यवसाय बंद ठेवला. त्यानंतर शासनाच्या निर्देशाचे पालन करीत हा व्यवसाय पुन्हा स्थिरावला आहे.
---------
नववर्षाचे होणार जल्लोषात स्वागत
सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाचे स्वागत करतानाचे क्षण अनेकांना संस्मरणीय करायचे असतात. त्याचे वेध आता सर्वांनाच लागले आहेत. त्यासाठी मित्रमंडळ एकत्रित येऊन जल्लोष करीत असतात. त्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यांचा हा सोहळा अधिक आनंददायी होण्यासाठी वस्त्रनगरीत हॉटेल व्यावसायिक सज्ज झाले आहेत. त्यासाठी विशेष सवलती, सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. वर्षभर सेवा-सुविधा देणारे हे व्यावसायिक या निमित्तानेही तत्पर आहेत.
----------
सोयी-सुविधांमुळे वाढला दर्जा
पूर्वी हॉटेल व्यवसाय मर्यादीत स्वरुपात केला होता. परंपरेप्रमाणे व्यवसाय केला जात होता. त्यामध्ये फारसे बदल स्वीकारले जात नव्हते. आता मात्र वाढत्या स्पर्धेमुळे या व्यावसायिकांनी आवश्यक बदल स्वीकारले आहेत. ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या आवश्यक सर्व सेवा- सुविधा पुरवण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात या व्यवसायाचा दर्जा वाढल्याचे चित्र आहे.
-----------
हॉटेल व्यवसायाचा इतिहास
उपलब्ध माहितीनुसार पंधराव्या शतकात फ्रान्स देशात हॉटेलमध्ये येणाऱ्या अभ्यागतांच्या नोंदी ठेवण्यासंबंधी नियम केले. यावेळी सर्वप्रथम प्रवासी मार्गदर्शिका प्रसिद्ध केली होती. त्याच सुमारास इंग्लंडमध्येही असा कायदा केला. त्यावेळी ६०० पेक्षा जास्त हॉटेल नोंदवण्यात आली होती. त्यानंतर युरोपमध्ये याला व्यावसायिक स्वरूप आले. १७६० मध्ये औद्योगिक क्रांती झाल्यानंतर इंग्लंड व अमेरिका या दोन्ही देशात हॉटेल निर्मितीला चालना मिळाली. भारत देशात प्राचीन काळापासून हॉटेल सेवा पथिकाश्रमाच्या स्वरुपात अस्तित्वात होती. अतिथी देवो भव, या प्रचलित मूल्यामुळे पाहुण्यांची व प्रवाशांची सरबराई करणे भारतीय समाज व्यवस्थेतील महत्त्वाचा गुणधर्म होता. विविध मठ, आश्रम शाळा अथवा मोठी व्यक्ती आल्यास गावप्रमुखांकडे व्यवस्था केली जात असे. तथापि, या सेवेचे व्यवसाय म्हणून रूपांतर व वाढ विसाव्या शतकातच झाली. आज देशभर या व्यवसायाने एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.