साई इंटरनॅशनलचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साई इंटरनॅशनलचे यश
साई इंटरनॅशनलचे यश

साई इंटरनॅशनलचे यश

sakal_logo
By

साई इंटरनॅशनलचे यश
गडहिंग्लज ः येथील साई इंटरनॅशनल स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वारणानगर व कोल्हापूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत यश मिळविले. रोहित नांदूरकर याने गोळाफेकमध्ये तृतीय, तर कोल्हापुरातील तायक्वांदो स्पर्धेत प्रद्नेश मोर्ती याने द्वितीय क्रमांक पटकावला. दरम्यान, स्कूलमध्ये वार्षिक क्रीडामहोत्सव उत्साहात झाला. मुख्याध्यापिका दीपाली कोरडे अध्यक्षस्थानी होत्या. आर्यनमॅन प्रकाश मोरे प्रमुख पाहुणे होते. या महोत्सवात विविध खेळाचे प्रकार उत्साहात झाले. तसेच, स्कूलमध्ये ख्रिसमस उत्साहात साजरा केला.
-----------------------------------------------------
GAD291.JPG
71782
गडहिंग्लज : स्पर्धेत यश मिळविलेल्या अनुध खलीफ हिला बक्षीस वितरणप्रसंगी रमेश कोरवी, सुनील शिंत्रे, शोभा शिंत्रे, गीता मोरे आदी.

हिटणीच्या खलीफची निवड
गडहिंग्लज ः हिटणी (ता. गडहिंग्लज) येथील विद्यामंदिरची विद्यार्थिनी अनुध खलीफ हिने सांस्कृतिक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. जिल्हास्तरीय अध्यक्ष चषक स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. तिने शिक्षणावर भाष्य करणारी कथा मांडली. तिला गीता मोरे यांचे मार्गदर्शन मिळाले. विस्तार अधिकारी रमेश कोरवी यांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविले. गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हलबागोळ, आजरा कारखान्याचे अध्यक्ष सुनील शिंत्रे, शोभा शिंत्रे यांची उपस्थिती होती.
-----------------------------------------------------
फोटो क्रमांक GAD292.JPG
71783
गडहिंग्लज ः कुमरीच्या प्रणाली नांदवडेकर हिला बक्षीस वितरणप्रसंगी शोभा शिंत्रे, रमेश कोरवी, सुनील शिंत्रे, महेश घुगरे, दिलीप पाटील आदी.

प्रणाली नांदवडेकरचे यश
गडहिंग्लज : कुमरी (ता. गडहिंग्लज) येथील विद्यामंदिरची विद्यार्थिनी प्रणाली नांदवडेकर हिने तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत कथाकथन प्रकारात द्वितीय क्रमांक मिळविला. तिने आप्पासाहेब खोत लिखित महापूर ही कथा सादर केली. तिला महेश घुगरे, दिलीप पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तिला शोभा शिंत्रे यांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. गटशिक्षणाधिकारी एन. बी. हलबागोळ, विस्तार अधिकारी रमेश कोरवी उपस्थित होते. मुख्याध्यापक राजेंद्र देसाई यांचे प्रोत्साहन लाभले. शोभा पोवार, कृष्णा पाटील, अशोक नांदवडेकर यांचे सहकार्य मिळाले.

‘विमा क्षेत्रातील संधी’वर व्याख्यान
गडहिंग्लज ः येथील रावसाहेबअण्णा कित्तूरकर महाविद्यालयात अकरावी व बारावी वाणिज्यच्या विद्यार्थ्यांसाठी ‘विमा क्षेत्रातील संधी’ या विषयावर व्याख्यान झाले. नाशिक विभागाचे शाखा प्रबंधक प्रशांत अघोर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर विमा क्षेत्रात संधी उपलब्ध होतात. विद्यार्थ्यांनी अधिकाधिक संख्येने विमा क्षेत्रातील आकर्षक करिअरकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले. संस्थेचे सहसचिव गजेंद्र बंदी, अनिता चौगुले, वीणा पोतदार, महावीर मरजे उपस्थित होते. प्राचार्य विजयकुमार चौगुले यांनी स्वागत केले. श्वेता दड्डी यांनी सूत्रसंचालन केले. मेघश्री भोसले यांनी आभार मानले.

फोटो क्रमांक GAD293.JPG ः
71784
यश बिद्रे

यश बिद्रेची निवड
गडहिंग्लज ः गिरोली येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग रोडरेस स्पर्धेत टाईम ट्रायल या प्रकारात येथील रावसाहेबअण्णा कित्तूरकर महाविद्यालयाचा विद्यार्थी यश बिद्रे याने प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्याची सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याबद्दल संस्थाध्यक्षा रत्नमाला घाळी यांच्या हस्ते सत्कार केला. कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी, उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर, सचिव बी. जी. भोसकी, सहसचिव गजेंद्र बंदी, संचालक किशोर हंजी, महेश घाळी, प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील, विजयकुमार चौगुले, अनिता पाटील, विलास शिंदे उपस्थित होते. क्रीडाशिक्षक दयानंद ग्वाडी यांचे मार्गदर्शन लाभले.