Wed, Feb 1, 2023

कांबळेंच्या पुस्तकाचे रविवारी प्रकाशन
कांबळेंच्या पुस्तकाचे रविवारी प्रकाशन
Published on : 29 December 2022, 11:43 am
कांबळेंच्या पुस्तकाचे रविवारी प्रकाशन
गडहिंग्लज : येथील प्रकाश कांबळे यांच्या ‘परिवर्तन’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (ता. १) सायंकाळी साडेसहाला होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक राजाभाऊ शिरगुप्पे अध्यक्षस्थानी असतील. आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार श्रीपतराव शिंदे, राजन पेडणेकर, डॉ. शरद गायकवाड, प्रा. किसनराव कुराडे, डॉ. शिवाजी रायकर, प्रकाश नाईक, प्रा. पी. डी. पाटील, संपत देसाई, सुभाष धुमे आदी प्रमुख पाहुणे आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. कांबळे यांनी केले आहे.