मंडलिक बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंडलिक बातमी
मंडलिक बातमी

मंडलिक बातमी

sakal_logo
By

पाणंद रस्त्यासाठी ४० कोटी
निधी मंजूर ः खासदार मंडलिक

कोल्हापूर, ता. २९ ः लोकसभा मतदारसंघातील सुमारे १७० किमीच्या पाणंद रस्त्यासाठी महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारच्या संयुक्त कार्यक्रमांतर्गत मातोश्री पाणंद योजनेमधून ४० कोटी रुपयांचा निधी मतदारसंघातील १०६ पाणंद रस्त्यासाठी मंजूर झाला असल्याची माहिती खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी दिली.
मातोश्री पाणंद योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पाणंद रस्ते शेतकऱ्यांच्या दृष्टीने वाहतुकीस सोयीचे व्हावेत. शेतीमालाची वाहतूक करताना सोय व्हावी. याकरिता शासनाने मातोश्री ग्रामसमृद्धी शेत, पाणंद योजना सुरू केली आहे. यामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राधानगरी तालुक्यात सुमारे ४८ किमी पाणंद रस्त्यासाठी ११ कोटी २८ लाख, कागल तालुक्यातील सुमारे ३७ किमी पाणंद रस्त्यासाठी ८ कोटी ६९ लाख ५० हजार, पन्हाळा तालुक्यातील ३४ किमी पाणंद रस्त्यासाठी ७ कोटी ९९ लाख, गडहिंग्लज तालुक्यातील २२.५ किमी पाणंद रस्त्यासाठी पाच कोटी २९ लाख, चंदगड तालुक्यातील १६ किमी. पाणंद रस्त्यासाठी तीन कोटी ७६ लाख, आजरा तालुक्यातील सहा किमी पाणंद रस्त्यासाठी एक कोटी ४१ लाख, करवीर व भुदरगड तालुक्यातील प्रत्येकी चार किमी पाणंद रस्त्यासाठी एक कोटी ८८ लाखांच्या पाणंद रस्त्यांचा समावेश आहे.
सदरचा निधी मिळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांचे सहकार्य लाभल्याचे प्रा. मंडलिक यांनी पत्रकात म्हटले आहे.