कोर्ट स्पर्धा राज्यस्तरीय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोर्ट स्पर्धा राज्यस्तरीय
कोर्ट स्पर्धा राज्यस्तरीय

कोर्ट स्पर्धा राज्यस्तरीय

sakal_logo
By

71933
कोल्हापूर : ज्युडिशियल एम्प्लॉयीज स्पोर्टस्‌ क्लब आयोजित राज्यस्तरीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे गुरुवारी शास्त्रीनगर मैदानावर उद्‍घाटन करताना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल. शेजारी जिल्हा न्यायाधीश पी. एफ. सय्यद, कुलपती संजय डी. पाटील, पोलिस निरीक्षक ईश्‍वर ओमासे, महेश पाटील, श्रीकांत संकपाळ, ए. ए. कारेकर.

न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी अनुभवले चौकार-षटकार!
राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेस कोल्हापुरात प्रारंभ; राज्यातील ३६ संघ सहभागी, चार दिवस पाच मैदानात सामने
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ : दैनंदिनीच्या व्यस्त कामातून बाहेर पडून आज न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी चौकार-षटकार अनुभवले. निमित्त होते ज्युडिशियल एम्प्लॉयीज स्पोर्टस्‌ क्लब कोल्हापूर व महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी क्रीडा व कल्याण संघटना आयोजित राज्यस्तरीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे. कोल्हापुरात आज या स्पर्धेला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांच्या हस्ते शास्त्रीनगर मैदानावर प्रारंभ झाला. रविवारपर्यंत चालणाऱ्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत राज्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे ३६ जिल्हा संघ सहभागी झाले आहेत.
एकाच वेळी कोल्हापुरातील शास्त्रीनगर मैदान, मेरी वेदर, बावडा पॅव्हेलियन ग्राउंड, दुधाळी पॅव्हेलियन व शाहूपुरी जिमखाना अशा पाच मैदानांवर हे सामने सुरू आहेत. सकाळी आठ वाजता एकाच वेळी पाचही मैदानांवर सामन्यांचा प्रारंभ ठिकठिकाणी केला. शास्त्रीनगर मैदानावर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांच्यासह जिल्हा न्यायाधीश पी. एफ. सय्यद, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी राजारामपुरी पलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे, जिल्हा न्यायालयाचे प्रभारी प्रबंधक ए. ए. कारेकर, स्टेट बँक ऑफ इंडियाचे रिजनल मॅनेजर विवेककुमार सिन्हा, अपर कोषागार अधिकारी ए. एल. हासबे, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे, जिल्हा न्यायालयीन वर्ग तीन संघटनेचे अध्यक्ष महेश पाटील,ज्युडिशियल एम्प्लॉयीज स्पोर्टस्‌ क्लबचे अध्यक्ष श्रीकांत संकपाळ यांच्यासह वकील, न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.
शाहूपुरी जिमखाना येथे मुख्य न्यायदंडाधिकारी शैलेष बाफना, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एच. आर. पाटील यांच्या हस्ते प्रारंभ झाला. यावेळी शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी, कोल्हापूर जिल्हा न्यायालयीन कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे सभापती सतीश देसाई, सहायक अधीक्षक संतोष जाधव, रमेश चौगुले, सागर पाटील, रोहित काटकर, प्रशांत कांबळे उपस्थित होते. तसेच कसबा बावडा येथील पॅव्हेलियन ग्राउंडवर दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्रीमती व्ही. पी गायकवाड, मेरी वेदर ग्राउंड येथे कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश डॉ. पी. के. अग्निहोत्री आणि दुधाळी पॅव्हेलियन येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पी. एम. पाटील यांच्या हस्ते सामन्यांना प्रारंभ झाला.
-------------
चौकट
विजयी संघ
लातूर, वर्धा, रत्नागिरी, मुंबई उच्च न्यायालय, गोंदिया, संभाजीनगर उच्च न्यायालय, नाशिक, रायगड, सांगली, परभणी, रत्नागिरी, नागपूर, पालघर, वाशिम, बीड, सातारा, नगर, कोल्हापूर (अ), बुलढाणा, पुणे, संभाजीनगर जिल्हा न्यायालय यांनी प्रतिस्पर्धी संघांवर विजय मिळवला.