संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त बातम्या
संक्षिप्त बातम्या

संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

कुंभार समाजाचा राज्यस्तरीय
वधुवर पालक परिचर मेळावा
कोल्हापूर, ता. २९ ः कुंभार समाजाचा वधुवर पालक परिचय मेळावा संत गोरा कुंभार वसाहतीत झाला. या मेळाव्याचे उद्‌घाटन उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी मधुरिमाराजे छत्रपती होत्या. चंद्रकांत पाटील यांनी मेळाव्यातून लग्नगाठी जोडल्या जातात. घटस्फोट रोखण्यासाठी विवाहापूर्वीच वधुवराच्या समुपदेशनासाठी समाजाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. मेळाव्यात गोवा, कर्नाटक, करमाळा, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सांगली, सावंतवाडी, सोलापूर येथून वधुवरांनी सहभाग घेतला. कुमावत को ऑप क्रेडिट सोसायटी, कोल्हापूर शहर कुंभार माल उत्पादक सोसायटी, कुंभार समाज विकास फौंडेशन यांनी संयोजन केले. यावेळी माजी नगरसेवक प्रकाश कुंभार - सरवडेकर, विलास वास्कर, अरुण निगवेकर, मनीषा वास्कर उपस्थित होते.
-
न्यू कॉलेजमध्ये श्रमसंस्कार शिबिर
कोल्हापूर ः न्यू कॉलेज राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे सांगरूळ (ता. करवीर) येथे श्रमसंस्कार शिबिर झाले. २२ ते २८ डिसेंबर या कालावधीत झालेल्या विशेष शिबिरात स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, गटचर्चा, पथनाट्य, व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम झाले. शिबिराच्या समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांनी व्यक्तिमत्त्व विकासाची जडण ही राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिरातून होते, असे मत व्यक्त केले. संस्थेचे संचालक वाय. एल. खाडे, उपप्राचार्य डॉ. ए. एम. शेख, ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य प्रा. एस. एन. इनामदार, प्रकल्प अधिकारी डॉ. के. सी. राठोड, डॉ. कविता गगराणी, डॉ. आर. एस. किरूळकर, प्रा. एन. एस. शिंदे, प्रा. अभिषेक श्रीराम, प्रा. शहाजी सुतार, प्रा. सौरभ खाडे, सर्जेराव खाडे, राजू मोरबाळे, अमित कांबळे, सागर पाटील उपस्थित होते.
--
गोखले कॉलेजमध्ये स्नेहसंमेलन
कोल्हापूर ः गोपाळ कृष्ण गोखले कॉलेजमध्ये विविध गुणदर्शन कार्यक्रम व यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करत स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम झाला. उद्‌घाटन सचिव प्रा. जयकुमार देसाई, चेअरमन प्रा. डॉ. मंजिरी मोरे, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलत देसाई, अंजली देसाई, अजित मोरे, पृथ्वीराज मोरे, उपप्राचार्य एस. एच. पिसाळ यांच्या हस्ते झाले. अनुष्का पाटील (नेमबाजी), प्रसाद कुंभार (शरीर सौष्ठव), राजवर्धन नाईक (सेल्स टॅक्स ऑफिसर), अन्नपूर्णा कांबळे (स्विमिंग), राज व्हटकर (वुशू), ऋतुराज इंगळे, रत्नेश कुंभार, निकिता पाटील (एनसीसी), यश शिंदे (नेमबाजी), सिद्धराज पाटील (गायक), प्रियंका कुंभार (कोरिओग्राफी), मनाली संकपाळ (कथ्थक), शिरत गेंजगे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. आर. बी. भुयेकर यांनी केले.
--
रत्नाप्पाण्णा कुंभारप्रेमींचा रविवारी मेळावा
कोल्हापूर ः ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या स्मृती जपण्यासाठी रत्नाप्पाण्णा कुंभार संविधान भवन बांधकामाबाबत रत्नाप्पाण्णा कुंभारप्रेमींच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यांचे जन्मगाव निमशिरगाव (ता. शिरोळ) येथे रविवारी (ता. १) दुपारी तीन वाजता महादेव मंदिरात हा मेळावा होईल. यावेळी पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या माजी अध्यक्षा रजनीताई मगदूम उपस्थित राहतील. मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. विश्वनाथ मगदूम यांनी केले आहे.
--
मुस्लिम बोर्डिंगच्या संस्थांचे स्नेहसंमेलन
कोल्हापूर ःमुस्लिम बोर्डिंगच्या नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, उर्दू हायस्कूल, शिरोली, प्रिन्सेस पद्माराजे विद्यालय, केसंट प्रायमरी स्कूल यांचे स्नेहसंमेलन केशवराव भोसले नाट्यगृहात झाले. यावेळी जाफर बाबा यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर होते. यावेळी प्रशासक कादरभाई मलबारी, रफीकभाई मुल्ला, मलिक बागवान, संचालक रफीक शेख, रिया मुल्ला, मुबप्पशिरा बेपारी, कुबेरा मलबारी उपस्थित होते. माजी नगरसेवक आदिल फरास यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.