नशामुक्त अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नशामुक्त अभियान
नशामुक्त अभियान

नशामुक्त अभियान

sakal_logo
By

71920
कोल्हापूर : येथील सायबर महाविद्यालयात आयोजित नशामुक्त भारत अभियानांतर्गत कार्यशाळेत दीपप्रज्वलन करताना दीपक घाडे. शेजारी डावीकडून प्रा. दीपक भोसले, अनु मौर्य, अनुष्का गुप्ता, प्रा. सुरेश आपटे.

कराल नशा, तर कुटुंबाची दुर्दशा
मान्यवरांचे मत; ‘सायबर’मध्ये कार्यशाळा
कोल्हापूर, ता. २९ : विविध कारणांमुळे व्यसनाधिनता वाढत असून त्यामुळे कुटुंबे उद्‌ध्वस्त होत आहेत. कराल नशा, तर कुटुंबाची होईल दुर्दशा हा संदेश देऊन समाजकार्य विभागाचे विद्यार्थी म्हणून तुम्ही संपूर्ण योगदान देऊन कुटुंबे उद्‌ध्वस्त होण्यापासून वाचवा, असे आवाहन सायबर महाविद्यालयात आयोजित नशामुक्त अभियानांतर्गत आयोजित कार्यशाळेत करण्यात आले.
केंद्र शासनाच्या नशामुक्त अभियानांतर्गत समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी या कार्यशाळेचे आयोजन केले होते. जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्‍घाटन झाले. यानंतर शिवानंद कोळी यांनी व्यसनमुक्तीचा पोवाडा सादर केला.
घाटे म्हणाले, ‘‘राज्यात दहा जिल्ह्यांत हे अभियान सुरू असून, यापाठीमागील हेतू आपण विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात पोहोचवावा.’’ समाजकार्य विभागप्रमुख प्रा. दीपक भोसले म्हणाले, ‘‘आयुष्य जगताना आयुष्याची वाताहत होणार नाही, असा मार्ग निवडण्यासाठी गरजूंना मार्गदर्शन आणि सहकार्य करण्याची गरज आहे.’’ अभियानाच्या राज्यसमन्वयक अनुष्का गुप्ता, अन्नू मौर्य यांनी विविध माहितीपट, स्लाईड शो याच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. या वेळी अधीक्षक सूर्यकांत म्हात्रे, प्राध्यापक उपस्थित होते. सदानंद बगाडे यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हास्तरीय समितीचे सदस्य प्रा. सुरेश आपटे यांनी आभार मानले.