शालेय फुटबॉल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शालेय फुटबॉल
शालेय फुटबॉल

शालेय फुटबॉल

sakal_logo
By

लोगो - राज्यस्तरीय शालेय फुटबॉल
71982, 71983
कोल्हापूर : राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत सतरा वर्षाखालील मुलांत विजेतेपद पटकावणारा पुणे विभागाचा संघ. शेजारी संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ. अरुण पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे, प्राचार्य एच. एम. नवीन, रवी चौधरी आदी. दुसऱ्या छायाचित्रात मुलींचा क्रीडाप्रबोधिनीचा संघ.


मुलांत कोल्हापूर, मुलींत क्रीडाप्रबोधिनी विजयी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ : राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत सतरा वर्षाखालील मुलांत कोल्हापूर विभागाने (महाराष्ट्र हायस्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज) पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीवर चार विरूद्ध एक गोलफरकाने मात करत विजेतेपद पटकाविले. मुलींत क्रीडाप्रबोधिनीने कोल्हापूर विभागाचा (विवेकानंद महाविद्यालय) ३ विरुद्ध १ गोलफरकाने पराभव करत बाजी मारली. जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे अतिग्रे येथील संजय घोडावत आंतरराष्ट्रीय स्कूलच्या मैदानावर स्पर्धेचे आयोजन केले आहे.
कोल्हापूर विभाग विरुद्ध क्रीडा प्रबोधिनी यांच्यातील सामन्यात कोल्हापूर विभागाने उत्कृष्ट खेळ केला. त्यांच्या आदित्य कल्लोळी व देवेश सुतारने प्रत्येकी दोन गोल नोंदविले. क्रीडा प्रबोधिनीकडून उन्मेश वाघला एक गोल करता आला. विजयी संघात विवेकसिंह पाटील, आयुष पाटील, रिहान मुजावर, पार्थ मोहिते, संचित तेलंग, देवेश सुतार, प्रेम देसाई, अभयसिंह पाटील, विराज पवार, आदित्य कल्लोळी, सर्वेश वाडकर, सुयश कापरे, कौस्तुभ नारकर, सार्थक कांबळे, अथर्व पाटील, सौरव ढाले, सोहम साळोखे, सोहम निकम यांचा समावेश होता. त्यांना प्रशिक्षक प्रदीप साळोखे, विजय पाटील, संतोष पोवार, शरद मेढे, सागर शिंदे यांचे मार्गदर्शन मिळाले. तृतीय क्रमांकासाठीच्या सामन्यात पुणे विभागाने औरंगाबाद विभागाचा ५-०ने पराभव केला. त्यांच्या कृष्णा पटेलने दोन, केविन चॅटर्जी, ॲरण डिसूझा, रिषभ जाधवने प्रत्येकी एक गोल केला.
मुलींत क्रीडा प्रबोधिनीने कोल्हापूर विभागाला ३ विरुद्ध १ गोलने हरविले. क्रीडा प्रबोधिनीकडून सुमय्या शेखने दोन, तर आदित्य गाडेकरने एक गोल केला. कोल्हापूर विभागाकडून निदा सतारमेकरला गोल करता आला. विजय संघात अस्मि कुलकर्णी, सुमय्या शेख, साक्षी इंगळे, आदिती गाडेकर, वैष्णवी पवार, प्रेरणा मेश्राम, तेजस्विनी थापा, गौरी कोळपे, वेदिका मोरया, तनिषा शिरसाट, मनाली गुरव, महेक शेख यांचा समावेश होता. त्यांना प्रशिक्षक धीरज मिश्रा यांचे मार्गदर्शन मिळाले.
पुणे विभागाने अमरावती विभागाला १-०ने हरवून तृतीय क्रमांक पटकाविला. संजय घोडावत इन्स्टिट्युटचे विश्‍वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ. अरूण पाटील, जिल्हा क्रीडाधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे, प्राचार्य एच. एम. नवीन, रवी चौधरी, क्रीडाधिकारी राजेंद्र घाडगे यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले.