‘क्रिडाई’च्या विशेष कॅम्पमध्ये १०० प्रकरणे मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘क्रिडाई’च्या विशेष कॅम्पमध्ये
१०० प्रकरणे मंजूर
‘क्रिडाई’च्या विशेष कॅम्पमध्ये १०० प्रकरणे मंजूर

‘क्रिडाई’च्या विशेष कॅम्पमध्ये १०० प्रकरणे मंजूर

sakal_logo
By

‘क्रिडाई’च्या विशेष कॅम्पमध्ये
१०० प्रकरणे मंजूर
कोल्हापूर, ता. २९ : शहरातील क्रिडाई सदस्यांच्या दाखल झालेल्या इमारत बांधकाम परवानगी व भोगवटा प्रमाणपत्रांसाठी आयोजित विशेष कॅम्पमध्ये दोन दिवसांत १०० प्रकरणे मंजूर करण्यात आली. १९ प्रकरणांची बांधकाम डिपॉझीट परत देण्यात आली. बुधवारी व गुरुवारी नगररचना विभागातर्फे दोन दिवस कॅम्पचे आयोजन केले होते. भोगवटा प्रमाणपत्र १६, बांधकाम परवानगी ४०, जोता चेकिंग, अनामत रक्कम परत १९, एकत्रीकरण व विभाजन २, मुदतवाढ १३ व टिडीआर खर्चीचे १० प्रस्ताव अशा १०० प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. कॅम्पला प्रतिसाद मिळाला. सहाय्यक संचालक रामचंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहर रचनाकार रमेश मस्कर, कनिष्ठ अभियंता यांनी कामे तपासली.